थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अनुतिन चार्नवीराकुल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मनःपूर्वक अभिनंदन केले.
भारत-थायलंडची बहुआयामी धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होण्यासाठी थायलंडच्या नव्या नेतृत्वासोबत काम करायला आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि थायलंड यांचे संबंध हे सामायिक सांस्कृतिक वारसा, घनिष्ठ सांस्कृतिक नाते आणि उत्साही लोकांमधील संबंधांवर आधारित आहेत, असे ते म्हणाले. भारत आणि थायलंड हे शांतता, प्रगती आणि समृद्धी या सामायिक ध्येयासाठी एकत्र आहेत असे त्यांनी पुढे नमूद केले.
पंतप्रधानांनी X वर लिहिले: "अनुतिन चार्नवीराकुल यांची थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. भारत-थायलंड या बहुआयामी धोरणात्मक भागीदारीला आम्ही आणखी बळकटी देऊ. आमचे संबंध सामायिक सांस्कृतिक वारसा, दृढ सांस्कृतिक नाते आणि उत्साही लोकांमधील संबंधांवर आधारित आहेत. भारत आणि थायलंड हे शांतता, प्रगती आणि समृद्धी या सामायिक ध्येयासाठी एकत्र आहेत."
Heartiest congratulations to Mr. Anutin Charnvirakul on his election as Prime Minister of the Kingdom of Thailand. I look forward to working closely with him. Together, we will further deepen the multifaceted India-Thailand Strategic Partnership. Our ties are rooted in shared…
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2026
ขอแสดงความยินดีอย่างยิ่งกับนายอนุทิน ชาญวีรกูล เนื่องในโอกาสที่ได้รับเลือกให้ดำรงตำแหน่งนายกรัฐมนตรีแห่งประเทศไทย ผมตั้งตารอที่จะได้ทำงานร่วมกันอย่างใกล้ชิดกับท่าน เราจะร่วมกันส่งเสริมความเป็นหุ้นส่วนทางยุทธศาสตร์ระหว่างอินเดียและไทยให้ลึกซึ้งยิ่งขึ้นในหลากหลายมิติ…
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2026


