पंतप्रधानांनी ‘प्रधानमंत्री राष्‍ट्रीय मदत निधी’तून सहाय्याची केली घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पालम भागामधल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, बाधित कुटुंबांसाठी प्रधानमंत्री राष्‍ट्रीय मदत निधीतून सहाय्याची घोषणा केली आहे.

दिल्लीतील पालम भागामध्‍ये लागलेल्या आगीच्या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत या दुर्घटनेमध्‍ये ज्यांनी आपल्या  प्रियजनांना  गमावले आहेत, त्यांच्याविषयी पंतप्रधानांनी  मनापासून संवेदना व्यक्त केल्या. जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा, यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी पुढे घोषणा केली की, पीएमएनआरएफ म्हणजेच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधिमधून प्रत्येक मृताच्या निकटच्या नातेवाईकाला दोन लाख रुपयांचे सहाय्य दिले जाईल, तसेच जखमींना 50 हजार  रुपयांची मदत दिली जाईल.

पंतप्रधानांनी 'एक्स ' या समाज माध्‍यमावर लिहिले:

"दिल्लीतील पालम येथे घडलेली आगीची घटना दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याविषयी  मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर आराम मिळावा.

मृताच्या  जवळच्या नातेवाईकांला  दोन  लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाईल.तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल : पंतप्रधान"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Commendable performance of India’s marine exports amid uncertain times

Media Coverage

Commendable performance of India’s marine exports amid uncertain times
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 2 मे 2026
May 02, 2026

Viksit Bharat Unfolding: PM Modi Delivers Jobs, Clean Energy, Digital Justice & Economic Firepower