त्रिपुरा राज्याचे मंत्री आणि राजकीय नेते श्री एन सी देववर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
आपल्या ट्विट संदेशात नरेंद्र मोदी म्हणतात:
"श्री एन सी देववर्माजी हे एक अतिशय मेहनती तळागाळातील स्तरावर काम करणारे नेते म्हणून येणाऱ्या पिढ्यांच्या स्मरणात राहतील. ते नेहमी लोकहितार्थ झटले. त्रिपुराच्या प्रगतीत त्यांनी मोठं योगदान दिलं. त्यांच्या निधनानं अतीव दु:ख झालं. त्यांचे कुटुंबीय आणि सुहृदांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती."
Shri NC Debbarma Ji will be remembered by the coming generations as a hardworking grassroots leader who always worked for the well-being of people. He made a rich contribution to Tripura’s progress. Pained by his demise. Condolences to his family and supporters. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) January 1, 2023


