पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात लेखिका आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या भगिनी गीता मेहता यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या एका x वरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“प्रख्यात लेखिका श्रीमती गीता मेहता जी यांच्या निधनाने मला तीव्र दु:ख झाले. त्या एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होत्या, ज्या त्यांच्या बुद्धिमत्ता आणि लेखन कौशल्य तसेच चित्रपट निर्मितीच्या आवडीसाठी ओळखल्या जायच्या. त्यांना निसर्ग आणि जलसंधारणाची विशेष आवड होती. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या संवेदना @Naveen_Odisha जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहेत. ओम शांती.”
I am saddened by the passing away of noted writer Smt. Gita Mehta Ji. She was a multifaceted personality, known for her intellect and passion towards writing as well as film making. She was also passionate about nature and water conservation. My thoughts are with @Naveen_Odisha…
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2023


