पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्या निधनाबद्दल  तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील  लोकांची सेवा करण्यासाठी सदैव अग्रभागी राहणारे अतिशय मेहनती नेते म्हणून अजित पवार यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय कामांची त्यांची जाण आणि गरीब आणि वंचितांना सक्षम करण्यासाठीची त्यांची तळमळ वाखाणण्याजोगी होती. "त्यांचे अकाली निधन ही अतिशय धक्कादायक आणि दुःखद बाब आहे. त्यांचे कुटुंब आणि अगणित चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे." असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

"श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले लोकनेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. महाराष्ट्रातील  लोकांची सेवा करण्यासाठी सदैव अग्रभागी राहणारे अतिशय मेहनती नेते म्हणून अजित पवार यांचा सर्वत्र आदर केला जात असे. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती."

 

"श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%

Media Coverage

India stands tall in shaky world economy as Fitch lifts FY26 growth view to 7.5%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 मार्च 2026
March 14, 2026

Heartening Resolve Meets Bold Action: PM Modi's Transformative Push for a Developed Assam.