पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी आणि ओडिया सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार साधू मेहेर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“श्री साधू मेहेर जी यांच्या निधनाने चित्रपट जगताचे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाचे मोठे नुकसान झाले आहे. हिंदी आणि ओडिया दोन्ही सिनेसृष्टीतील एक ज्येष्ठ रंगकर्मी, त्यांची पडद्यावरील कामगिरी आणि समर्पण अनुकरणीय होते. या कधीही भरून न येणाऱ्या नुकसानाबद्दल त्यांचे कुटुंब, सहकारी आणि अनेक चाहत्यांबरोबर माझ्या सहवेदना आहेत. त्यांच्या स्मरणार्थ, त्यांनी सोडलेला समृद्ध कलात्मक वारसा आम्ही जपत राहू. ओम शांती.”
The demise of Shri Sadhu Meher Ji is a profound loss for the world of films and our cultural heritage. A stalwart in both Hindi and Odia cinema, his cinematic performances and dedication was exemplary. My thoughts are with his family, colleagues, and many fans mourning this…
— Narendra Modi (@narendramodi) February 3, 2024


