शेअर करा
 
Comments

तेलंगणातील नागरकुर्नूल येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत ही पंतप्रधानांनी घोषित केली आहे. 

पंतप्रधान कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात, "तेलंगणामध्ये नागरकुर्नूल येथील अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत, पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीतून करण्यात येईल.- पंतप्रधान मोदी."

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Over 28,300 artisans and 1.49 lakh weavers registered on the GeM portal

Media Coverage

Over 28,300 artisans and 1.49 lakh weavers registered on the GeM portal
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
September 20, 2021
शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री राजपुत्र फैझल बिन फरहान अल सौद यांची भेट घेतली. उभय देशांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या धोरणात्मक भागीदारी परिषदेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांसह , सध्या सुरु असलेल्या विविध द्विपक्षीय उपक्रमांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

भारतात उर्जा,माहिती तंत्रज्ञान,संरक्षण उत्पादन यासह महत्वाच्या इतर क्षेत्रामध्ये  सौदी अरेबियाकडून मोठ्या  गुंतवणूकीची अपेक्षा  पंतप्रधानांनी व्यक्त केली.

अफगाणीस्तानमधल्या परिस्थितीसह प्रादेशिक घडामोडींवर या बैठकीत विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले.

कोविड -19 महामारीच्या काळात सौदी अरेबियामधल्या भारतीय समुदायाच्या कल्याणाची काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी, सौदी अरेबियाचे विशेष आभार मानत प्रशंसा केली.

सौदी अरेबियाचे राजे आणि युवराज  यांनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.