कॅनडातील गोळीबाराच्या घटनेत आपले प्रियजन गमावलेल्या कुटुंबांप्रति, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. या भीषण दु:खाच्या प्रसंगी भारत कॅनडाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :
"कॅनडातील भीषण गोळीबाराच्या घटनेने धक्का बसला. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या कुटुंबांप्रति माझ्या सहवेदना आणि जखमी लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा. या भीषण दु:खाच्या प्रसंगी भारत कॅनडाच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे."
@MarkJCarney
Deeply shocked by the horrendous shooting in Canada. I extend my heartfelt condolences to the families who have lost their loved ones and wish a speedy recovery to the injured. India stands in solidarity with the people of Canada in this moment of profound grief. @MarkJCarney
— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2026


