पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून आर्थिक मदत केली जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कटिहार येथे झालेल्या दुर्दैवी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे नमूद केले.
पंतप्रधानांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी  प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर केली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले:
“बिहारमधील कटिहार येथील अपघात अत्यंत वेदनादायक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना.
मृतांच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
UPI-ng the ante: PM Modi wants desi connect with global pay

Media Coverage

UPI-ng the ante: PM Modi wants desi connect with global pay
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 सप्टेंबर 2026
September 08, 2026

Viksit Bharat, Many Engines: Defence, Diplomacy, Growth & Green Power Under PM Modi