महाराष्ट्रात बारामती येथील दुर्दैवी विमान दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. "या विमान अपघातात प्राण गमावलेल्यांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. या अत्यंत दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबांना सामर्थ्य आणि धैर्य मिळो, यासाठी मी प्रार्थना करतो." असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:

"महाराष्ट्रात बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेने अत्यंत व्यथित झालो आहे. आपल्या  प्रियजनांना गमावलेल्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अत्यंत दुःखद प्रसंगी शोकाकुल कुटुंबांना सामर्थ्य आणि धैर्य मिळो, अशी प्रार्थना करत आहे."

 

"महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Mapping the subsurface: How ICAR’s ‘Soil Intelligence’ is reshaping India’s mega infrastructure boom

Media Coverage

Mapping the subsurface: How ICAR’s ‘Soil Intelligence’ is reshaping India’s mega infrastructure boom
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
September 11, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान म्हणाले की, आचार्य विनोबा भावे यांची जय जगत ही प्रेरणादायी हाक सर्व सीमांच्या पलीकडे जाणारी होती आणि तिने मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.

मोदी म्हणाले की, आपल्या विविध प्रयत्नांतून आचार्य विनोबा भावे यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्य केले.

पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, समानता, प्रतिष्ठा आणि सेवा यांवरील त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे समाजातील सर्वात वंचित घटकांना बळ मिळाले.

मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे;

"आचार्य विनोबा भावे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली.

त्यांची जय जगत ही प्रेरणादायी हाक सर्व सीमांच्या पलीकडे जाणारी होती आणि तिने मानवतेला सर्वोच्च स्थान दिले.

आपल्या विविध प्रयत्नांतून त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्य केले.

समानता, प्रतिष्ठा आणि सेवा यांवरील त्यांच्या अढळ श्रद्धेमुळे समाजातील सर्वात वंचित घटकांना बळ मिळाले.