पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट मालिकेत पंतप्रधान म्हणाले;
"उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे ट्रॅक्टर ट्रॉली नदीत पडल्यामुळे झालेला अपघात अत्यंत दुःखदायक आहे. या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रति संवेदना प्रकट करत सर्व जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी कामना करतो : पंतप्रधान "
"शाहजहांपूर येथे झालेल्या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासन तत्परतेने बचाव कार्य करत आहे. दुर्घटनेतील पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे : पंतप्रधान "
"उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल : पंतप्रधान"
उत्तर प्रदेश के शाहजहांपुर में ट्रैक्टर ट्रॉली के नदी में गिरने से हुई दुर्घटना अत्यंत आहत करने वाली है। इस हादसे में जिन लोगों ने अपने प्रियजनों को खोया है, उनके प्रति गहरी संवेदना प्रकट करने के साथ ही मैं सभी घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूं: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 15, 2023
An ex gratia of Rs. 2 lakh would be given to the next of kin of each of those who lost their lives in the mishap in Shahjahanpur, UP. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) April 15, 2023


