बिहारच्या मोतिहारी इथं झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
या अपघातात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर, जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान, प्रधानमंत्री मदत निधीतून जाहीर करण्यात आलं आहे.
पंतप्रधानांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे:
"मोतिहारी इथल्या वीटभट्टीत झालेल्या अपघातातील जीवितहानीचे वृत्त अतिशय दु:खद आहे. या अपघातातील पीडित कुटुंबाप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो. प्रधानमंत्री मदतनिधीतून बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची मदत तर, जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे"
Pained by the loss of lives due to a mishap at a brick kiln in Motihari. Condolences to the bereaved families. Prayers with the injured. An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2022