पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मदनदास देवी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
मदनदास देवी यांनी आपले आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. दिवंगत मदनदास देवी यांच्याशी असलेल्या घनिष्ठ वैयक्तिक संबंधांचे स्मरण करून आपण त्यांच्याकडून खूप काही शिकलो, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :
"मदनदास देवी यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांचे आणि माझे नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध होते, त्यांच्याकडून कायमच खूप काही शिकायला मिळाले. या दुःखद प्रसंगी परमेश्वर सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो. ओम शांती."
श्री मदन दास देवी जी के देहावसान से अत्यंत दुख हुआ है। उन्होंने अपना पूरा जीवन राष्ट्रसेवा में समर्पित कर दिया। उनसे मेरा न सिर्फ घनिष्ठ जुड़ाव रहा, बल्कि हमेशा बहुत कुछ सीखने को मिला। शोक की इस घड़ी में ईश्वर सभी कार्यकर्ताओं और उनके परिवारजनों को संबल प्रदान करे। ओम शांति!
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2023


