पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील जालौर इथल्या रस्ते अपघातात झालेल्या जीवित हानिबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ही दुःखद हानी सहन करण्यासाठी मृतांच्या कुटुंबियांना बळ मिळावे अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे:
“राजस्थानमधील जालोरमध्ये झालेल्या रस्ते अपघाताची घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या प्रसंगी ईश्वर त्यांना शक्ती प्रदान करो: पंतप्रधान @narendramodi”
राजस्थान के जालौर में हुई सड़क दुर्घटना अत्यंत दुखद है। इसमें जिन लोगों को जान गंवानी पड़ी है, उनके परिजनों के प्रति मैं अपनी संवेदना व्यक्त करता हूं। ईश्वर दुख की इस घड़ी में उन्हें संबल प्रदान करे: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 28, 2022


