भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक मंडपाजवळील ग्रँड ओपन स्टेअरकेस येथे चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, देशाच्या भाग्याला आकार देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याचा आणि वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्याचा भारताचा ठाम संकल्प या उपक्रमातून प्रतिबिंबित होतो. राजाजी हे विद्वान अभ्यासक, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि कुशल प्रशासक होते. त्यांचे जीवन प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवन येथे आयोजित ‘राजाजी उत्सवा’लाही उपस्थिती दर्शविली. ‘राजाजी उत्सव’ अंतर्गत राजाजी यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन 24 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत राष्ट्रपती भवन येथे करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राजाजी उत्सव’ हा  राष्ट्राप्रति  राजाजी यांच्या बहुआयामी योगदानाचे विविध पैलू समोर आणणारा उपक्रम असल्याचे सांगितले. नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन त्यांच्या जीवनातून आणि आदर्शांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रपतींच्या संबंधित उपक्रमांविषयीच्या ‘एक्स’वरील संदेशांना प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ‘एक्स’वर नमूद केले  :

“देशाच्या भाग्याला आकार देणाऱ्यांचा सन्मान करण्याचा आणि वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्याचा भारताचा ठाम संकल्प दर्शविणारा हा प्रशंसनीय उपक्रम आहे.

राजाजी हे महान विद्वान, स्वातंत्र्यसैनिक,विचारवंत आणि प्रशासक होते. त्यांचे जीवन प्रामाणिकपणा, बुद्धिमत्ता आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक होते.”

 

 

“Rajaji Utsav is a wonderful initiative, which brings out different aspects of Rajaji's rich contribution to our nation. I urge you all to visit it and get inspired!”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India unveils 20 major maritime reforms to cut logistics costs and boost global trade presence

Media Coverage

India unveils 20 major maritime reforms to cut logistics costs and boost global trade presence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 एप्रिल 2026
April 09, 2026

Self-Reliant India Rising: Record Investments, 3rd in Renewables & Affordable Skies Under PM Modi