शेअर करा
 
Comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड –19 परिस्थितीचा आणि लस निर्मिती , वितरण आणि व्यवस्थापन सज्जतेचा आढावा घेतला. या बैठकीला  केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ  हर्ष वर्धन, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, सदस्य (आरोग्य) नीती  आयोग, प्रधान वैज्ञानिक सल्लागार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पंतप्रधान कार्यालयाचे आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोविड रुग्णांच्या दररोजच्या संख्येत आणि वाढीच्या दरामध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

भारतात तीन लसी विकासाच्या प्रगत टप्प्यात आहेत, त्यापैकी 2 दुसऱ्या टप्प्यात आणि एक तिसऱ्या टप्प्यात आहे. भारतीय वैज्ञानिक आणि संशोधन पथके  अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, मालदीव, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका या शेजारील देशांबरोबर सहकार्य करत असून संशोधन क्षमता  मजबूत करत आहेत. बांगलादेश, म्यानमार, कतार आणि भूतानकडून त्यांच्या देशांमध्ये क्लिनिकल चाचण्यांसाठी विनंती केली जात आहे.  जागतिक समुदायाला मदत करण्याच्या प्रयत्नासाठी पंतप्रधानांनी  सूचना केली की आपण लस वितरण प्रणालीसाठी लसी, औषधे आणि आयटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी आपले प्रयत्न शेजारी देशांपुरते  मर्यादित ठेवू नये तर  संपूर्ण जगापर्यंत पोहोचवले पाहिजेत.

कोविड –19 (एनईजीव्हीएसी) साठी लस प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ञ गटाने  राज्य सरकार आणि सर्व संबंधित हितधारकांशी सल्लामसलत करून लसीचा साठा, वितरण आणि व्यवस्थापनाचा सविस्तर आराखडा तयार केला  आणि सादर केला.  राज्यांशी सल्लामसलत करून तज्ज्ञ गट लस प्राधान्य आणि लस वितरणावर सक्रियपणे कार्य करत आहे.

पंतप्रधानांनी देशाची भौगोलिक व्याप्ती आणि  विविधता लक्षात घेऊन लस उपलब्धता  जलद गतीने सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. लस वाहतूक , वितरण आणि व्यवस्थापनातील  प्रत्येक पाऊल कठोरपणे उचलण्यावर  पंतप्रधानांनी भर दिला. त्यामध्ये शीतगृह साखळी, वितरण नेटवर्क, देखरेख यंत्रणा, आगाऊ मूल्यांकन आणि वेल्स, सिरिंज इ.आवश्यक उपकरणे तयार करणे यांचा समावेश असावा.

आपण  निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुभवाचा  देशात वापर करायला हवा असेही त्यांनी निर्देश दिले. पंतप्रधान म्हणाले की, त्याच पद्धतीने लस वितरण आणि प्रशासकीय यंत्रणाचे नियोजन केले जावे.  यात राज्ये / केंद्रशासित प्रदेश / जिल्हा पातळीवरील अधिकारी, नागरी संस्था, स्वयंसेवक, नागरिक आणि सर्व आवश्यक क्षेत्रातील  तज्ञांचा सहभाग असावा. संपूर्ण प्रक्रियेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा मजबूत कणा असावा आणि व्यवस्थेची रचना अशा पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून आपली आरोग्य सेवा प्रणाली शाश्वत राहील.

आयसीएमआर आणि जैव-तंत्रज्ञान विभाग  (डीबीटी) द्वारे आयोजित भारतातील सार्स सीओव्ही –2 (कोविड –19 विषाणू ) च्या जनुका  विषयी भारतातील दोन  अभ्यासातून असे सुचवले आहे की हा विषाणू जनुकीय दृष्ट्या स्थिर आहे आणि विषाणूमध्ये कोणताही प्रमुख बदल नाही .

रुग्णसंख्येत घट  झाल्याबद्दल आत्मसंतुष्ट न राहता  सावधगिरी बाळगून महामारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन  पंतप्रधानांनी केले. आगामी सण उत्सवाच्या  निमित्ताने सुरक्षित  सामाजिक अंतर, मास्कचा वापर , नियमितपणे हात धुणे आणि स्वच्छता राखणे यासारखे कोविड प्रतिबंधात्मक उपाय सुरूच ठेवण्यावर  त्यांनी भर दिला.

 

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Mann KI Baat Quiz
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Business optimism in India at near 8-year high: Report

Media Coverage

Business optimism in India at near 8-year high: Report
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
संसदेच्या 2021 च्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी माध्यमांना दिलेले निवेदन
November 29, 2021
शेअर करा
 
Comments

नमस्कार मित्रहो,

संसदेचे हे सत्र अतिशय महत्वपूर्ण आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. हिंदुस्तानच्या चहू बाजूनी, स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवा निमित्त  रचनात्मक, सकारात्मक आणि जनहितार्थ, राष्ट्र हितासाठी, जनता अनेक कार्यक्रम करत आहे, पावले उचलत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येय्याने झपाटलेल्या सर्वांनी जी स्वप्ने पहिली होती, ती स्वप्ने साकारण्यासाठी सामान्य नागरिकही देशाप्रती आपले उत्तरदायित्व निभावण्याचा प्रयत्न करत आहे, हे भारताच्या उज्वल भविष्यासाठी नक्कीच सुचिन्ह आहे.

काल आपण पाहिले. मागील संविधान दिनीही, नव्या संकल्पासह संविधानाचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येकाच्या दायित्वाप्रती देशाने एक संकल्प केला. त्या दृष्टीकोनातून आपण, देश, देशाच्या सर्व सामान्य नागरिकाचीही हीच इच्छा असेल की भारताच्या संसदेचे हे सत्र आणि येणारे पुढील सत्रही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडणाऱ्या सर्वांच्या ज्या भावना होत्या, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ज्या भावना आणि चैतन्य आहे त्याला अनुलक्षून संसदेतही देशहिताची चर्चा व्हावी, देशाच्या प्रगतीसाठी मार्ग शोधावेत, देशाच्या प्रगतीसाठी नवे मार्ग शोधावेत आणि यासाठी हे सत्र वैचारिक दृष्ट्या समृध्द, दूरगामी परिणाम निर्माण करणारे आणि सकारात्मक निर्णय घेणारे राहावे. संसदेचे कामकाज कसे चालले, किती उत्तम योगदान दिले या दृष्टीकोनातून भविष्यात मूल्यमापन केले जाईल अशी मला आशा आहे, कोणी किती जोर लावून संसदेच्या सत्रात अडथळा आणला हा मापदंड असू शकत नाही. संसदेत किती तास काम झाले, किती सकारात्मक काम झाले हा निकष असेल. सरकार प्रत्येक विषयावर चर्चेला तयार आहे, खुल्या चर्चेला तयार आहे. सरकार प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तयार आहे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात संसदेत प्रश्नही असावेत आणि संसदेत शांतताही असावी अशीच आमची इच्छा आहे.

आमची इच्छा आहे की, संसदेत सरकार विरोधात, सरकारच्या धोरणाविरोधात आवाज प्रखर असावा मात्र संसदेची प्रतिष्ठा, अध्यक्षांचा सन्मान, आसनाची प्रतिष्ठा याबाबत आपले आचरण असे असावे जे आपल्या भावी पिढ्यांसाठी उपयोगी ठरेल. मागच्या सत्रा नंतर कोरोनासारख्या खडतर परिस्थितीतही देशाने कोरोना प्रतिबंधक लसीच्या 100 कोटीपेक्षा अधिक मात्रा दिल्या आणि आता आपण 150 कोटीच्या दिशेने झपाट्याने निघालो आहोत. उत्परावर्तीत नव्या विषाणूसंदर्भातले वृत्त  आपल्याला अधिकच दक्ष आणि सजग करत आहे. संसदेच्या सर्व सहकाऱ्यांनाही मी सतर्क राहण्याची विनंती करतो. आपण सर्वानीही सावध राहावे अशी विनंती  करतो. कारण संकटाच्या अशा काळात आपणा सर्वांचे उत्तम आरोग्य, देशवासीयांचे उत्तम आरोग्य याला आमचे प्राधान्य आहे.

देशाच्या 80 कोटी हून अधिक नागरिकांना या कोरोनाकाळाच्या संकटात अधिक त्रास सोसावा लागू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोफत अन्नधान्य देण्याची योजना सुरु आहे. मार्च 2022 पर्यंत या योजनेला मुदत वाढ देण्यात आली आहे. सुमारे दोन लाख साठ हजार कोटी रुपये खर्चून ऐंशी कोटीहून अधिक गरिबांच्या घरची चूल या काळातही पेटावी याची काळजी घेण्यात आली आहे. या सत्रात देशहिताचे निर्णय आम्ही वेगाने घेऊ, एकजुटीने घेऊ अशी आशा मी करतो. सर्व सामान्य जनतेच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण करणारे हे निर्णय असावेत अशी अपेक्षा करतो. खूप-खूप धन्यवाद.