टोक्यो  येथील निप्पॉन बुडोकान येथे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारांना 20 हून अधिक देश /सरकारांच्या प्रमुखांसह 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना एक प्रिय मित्र आणि भारत-जपान भागीदारीचे महान पुरस्कर्ते मानणाऱ्या पंतप्रधानांनी आबे यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.

शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारानंतर, पंतप्रधानांनी आकासाका पॅलेसमध्ये स्वर्गीय पंतप्रधान आबे यांच्या पत्नी अकी आंबे यांची खाजगी भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी श्रीमती आबे यांच्याकडे  शोकभावना  व्यक्त केल्या. भारत-जपान संबंधांना नवीन उंचीवर नेण्यासाठी  माजी पंतप्रधान आबे यांनी दिलेला  प्रेमळ मैत्रीचा हात  आणि त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचे त्यांनी स्मरण केले. त्यानंतर पंतप्रधानांनी  पंतप्रधान किशिदा यांच्याशीही संवाद साधत शोक व्यक्त केला.

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
7 years of GST: Households emerge top beneficiaries, shows CBIC data

Media Coverage

7 years of GST: Households emerge top beneficiaries, shows CBIC data
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 जून 2024
June 24, 2024

Modi 3.0 – Holistic Growth with Progessive Policies impacting people from all walks of life