पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी इंडोनेशियातील बाली येथे भारतीय समुदाय आणि भारत  मित्रांच्या 800 हून अधिक सदस्यांना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. संपूर्ण इंडोनेशियामधून उत्साही आणि वैविध्यपूर्ण अशी गर्दी जमली होती.

आपल्या भाषणात, पंतप्रधानांनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील घनिष्ठ सांस्कृतिक आणि सभ्यता यातील  संबंधांचा उल्लेख केला. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि व्यापारी  संबंध अधोरेखित करण्यासाठी त्यांनी "बाली जत्रे" च्या प्राचीन परंपरेचा संदर्भ दिला. भारत आणि इंडोनेशियामध्ये  विविध क्षेत्रात असलेली  समानताही त्यांनी अधोरेखित केली.

आपल्या कठोर मेहनतीने आणि समर्पणाद्वारे परदेशात भारताची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल पंतप्रधानांनी समुदायाच्या सदस्यांचे कौतुक केले. भारत-इंडोनेशिया संबंधांच्या सकारात्मक वाटचालीबद्दल आणि ते संबंध मजबूत करण्यात भारतीय समुदायाच्या सदस्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेचाही त्यांनी उल्लेख केला.

डिजिटल तंत्रज्ञान, वित्त, आरोग्य, दूरसंचार आणि अंतराळ यासारख्या विविध क्षेत्रातली  भारताची प्रगती, यश आणि अतुलनीय कामगिरी  पंतप्रधानांनी अधोरेखित केली.   भारताच्या विकासाच्या रुपरेखेत जगाच्या राजकीय आणि आर्थिक आकांक्षांचा समावेश आहे आणि स्वयंपूर्ण भारताची कल्पना जागतिक हिताच्या भावनेला मूर्त रूप देते असेही त्यांनी नमूद केले.

8 ते 10 जानेवारी 2023 दरम्यान मध्य प्रदेशमधील इंदूर येथे होणाऱ्या आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद  आणि त्यानंतर गुजरातमध्ये होणाऱ्या पतंग महोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांनी समुदायातील सदस्य आणि भारतीय मित्रांना आमंत्रित केले.

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
India’s Defense Export: A 14-Fold Leap in 7 Years

Media Coverage

India’s Defense Export: A 14-Fold Leap in 7 Years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 जुलै 2024
July 14, 2024

New India celebrates the Nation’s Growth with PM Modi's dynamic Leadership