पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसीमध्ये बाबा विश्वनाथ धामचे  उद्घाटन केल्यानंतर, त्यांनी पूजा केली आणि गंगेत पवित्र स्नान केले.  त्यानंतर सोमवारी  संध्याकाळी पंतप्रधान गंगा आरतीला उपस्थित राहिले. 

गंगा आरती नेहमीच नव्या उर्जेने भारुन टाकते असे ट्विट त्यांनी गंगा आरतीबाबत केले. ते म्हणाले “काशीची गंगा आरती नेहमीच अंतर्मन नव्या  उर्जेने भारुन टाकते. आज काशीचे मोठे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर दशाश्वमेध घाटावर गंगा आरतीत सहभागी झालो आणि गंगामातेस कृपा करावी यासाठी नमन केले. नमामि गंगे तव पाद पंकजम्।“

त्यानंतर पंतप्रधानांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विस्तृत बैठक घेतली.

पंतप्रधानांनी ट्विट केले की, "काशी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत विस्तृत बैठक नुकतीच संपली."

पंतप्रधान रेल्वे स्थानकावरही गेले. ते म्हणाले “पुढिल थांबा..  बनारस स्थानक. आम्ही रेल्वे संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्यासाठी तसेच स्वच्छ, आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानके सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहोत. "

लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी नेहेमी प्रमाणेच रात्री उशिरा विकास प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी जनतेने प्रचंड उत्साह दाखवला, हे सारे त्यांचे (त्यांचे खासदार)  पंतप्रधानांप्रती असलेले प्रेमच दर्शवते.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's offshore tech hubs hit $98.4 bn revenue in FY26, says report

Media Coverage

India's offshore tech hubs hit $98.4 bn revenue in FY26, says report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 6 मे 2026
May 06, 2026

New India, New Pride: When Self-Reliance Meets Results — A Tribute to PM Modi