शेअर करा
 
Comments
We must ensure affordable & quality healthcare for all: PM Modi
Land of Kashi is of spiritual importance and has tremendous tourism potential: PM Modi
Let us make sports an essential part of our lives: PM Modi

काशीमध्ये आज मला अनेक प्रकल्पांचे कोनशिला अनावरण करण्याची म्हणा, लोकार्पण करण्याची म्हणा, प्रोत्साहन म्हणा, संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. आज एकाच दिवसात जवळ-जवळ 2100 कोटी रुपयांचे प्रकल्प काशीला मिळत आहेत. आज विशेषत्वाने आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरीबातील गरीब कुटुंबाला रुग्णालयात योग्य उपचार मिळाले पाहिजेत, त्याच्या आरोग्यासाठी आधुनिक संसाधनांचा लाभ मिळाला पाहिजे. आज ईएसआयसीच्या रुग्णालयांचे आधुनिकीकरण करून पूर्वी जितकी क्षमता होती त्याच्या दुपटीहूनही जास्त क्षमता निर्माण करणे, आधुनिकतेबरोबरच गरीबातील गरीब सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्‍या व्यक्तीला, कारखान्यामध्ये आयुष्य घालवणारी व्यक्ती अशा लोकांना या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठीच भारत सरकारने हा संपूर्ण प्रकल्प आपल्या हाती घेऊन येथील गरीब कामगारांच्या सोयीसुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे आणि हा जो या सर्व व्यवस्थेमध्ये बदल होत आहे, विस्तार होत आहे, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी त्याचा मेळ घालण्याचा प्रयत्न होत आहे, तो या क्षेत्राच्या आरोग्याच्या दृष्टिने एक नवा नजराणा बनेल, असा मला विश्वास आहे. आताच मी काशी विद्यापीठात गेलो होतो. तिथे मी एका कर्करोग संशोधन संस्थेची कोनशिला बसवली. या संपूर्ण भागात कोणाला कर्करोग झाला तर त्या व्यक्तीला मुंबईला जावे लागते आणि आपल्याला हे माहित आहेच की मुंबईत रुग्णालयात किती वेळाने एखाद्याला उपचार मिळतात. मग मुंबईत जे कर्करोग रुग्णालय आहे, तशाच प्रकारच्या सोयी असलेले चांगल्यात चांगले उपचार करणारे रुग्णालय उत्तर प्रदेशात का असू नये. विशेषतः पूर्व उत्तर प्रदेशात असावे. ज्या रुग्णालयाचा फायदा शेजारील झारखंड आणि बिहारच्या लोकांनाही मिळेल. एका अतिशय मोठ्या प्रकल्पाचे भूमिपूजन आज मी काशी विद्यापीठाच्या कार्यक्रमाते केले आहे. त्या संपूर्ण भागाला यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे. आपल्याला हे माहित आहेच की आरोग्य क्षेत्रातही सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या मॉडेलचे तितकेच महत्त्व आहे. खाजगी रुग्णालये या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करत असतात. भारताचे एक सुपुत्र श्रीयुत शेट्टी महोदय तर कर्नाटकचे आहेत आणि आखाती देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र, त्यांनी आरोग्याच्या क्षेत्रात खूपच विस्तृत कार्य केले आहे. अनेक ठिकाणी त्यांची रुग्णालये सुरू आहेत. त्यांनासुद्धा काशीचे आकर्षण वाटल्याने ते स्वतःचे एक खाजगी रुग्णालय काशीमध्ये सुरू करत आहेत. आज त्याचे भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली. 500 खाटांचे हे एवढे मोठे रुग्णालय काशीमध्ये उभारले जाणे ही काशीसाठी सर्वात मोठी भेट आहे. 500 पैकी 200 खाटा संपूर्णपणे गरीब आजारी लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतील. बाकी ज्या 300 खाटा आहेत त्या सुपर स्पेशालिटी सेवांसाठी असतील. त्याचबरोबर एका प्रकारे गरीबांचे कल्याण करणा-या आणि या भागातील सर्वात मोठे असलेल्या या रुग्णालयाच्या उभारणीमुळे या भागातील हजारो युवकांना नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. आरोग्य क्षेत्रात काम करणारे मनुष्यबळ विकसित होईल. रुग्णसेवा कर्मचारी असतील, परिचारिका कर्मचारी असतील, रुग्णालयाची देखभाल असेल. तर एका खूपच मोठ्या या गुंतवणुकीमुळे या भागाचा फायदा होणार आहे.

आज ज्या प्रकल्पाचे मी भूमिपूजन केले त्यासाठी सध्याच्या काळात आमच्या मंत्रीमहोदया स्मृती इराणी अतिशय मेहनत घेऊन खूपच बारकाईने या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. याच सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा परिणाम आहे ज्यामुळे इतक्या कमी काळात मला या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले आहे. मी स्मृतीजींचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आणि यापूर्वी या भागाचे जे मंत्री होते त्या गंगवारजींचे अगदी मनापासून अभिनंदन करतो कारण हे काम अतिशय जलदगतीने झाले आहे. आज निर्धारित कालावधीमध्ये झालेले या पहिल्या टप्प्याचे काम केवळ काशीच्याच लोकांसाठी नाही तर या संपूर्ण भागासाठी आहे. काशी एक तीर्थक्षेत्र आहे तसेच पर्यटनस्थळ देखील आहे. काशीची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्यामध्ये अशा प्रकारची व्यवस्था खूप महत्त्वाची ठरू शकते. आता काशीमध्ये जे लोक येतील  त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले पाहिजे. इथले रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले असतील त्यांनाही याची माहिती असली पाहिजे. त्यांनी देखील हे लक्षात घेतले पाहिजे की या भागातील लोकांच्या अंगात कोणती कलाकौशल्ये आहेत. ते लोक कोणकोणत्या वस्तू तयार करतात, त्यांची जागतिक पातळीवर ओळख निर्माण झाली पाहिजे, त्यांच्या उत्पादनांची ओळख निर्माण झाली पाहिजे, उत्पादनप्रक्रियांची ओळख निर्माण झाली पाहिजे आणि भारताच्या या प्राचीन वारशाचा सांभाळ काशीच्या लोकांनी कशा प्रकारे केला आहे याची ओळख जगाला झाली पाहिजे. अशा प्रकारचे एक उत्तम काम ट्रेड सेंटर, म्युझियममुळे होत आहे. काल रात्री इकडच्या काही लोकांनी मला त्याची छायाचित्रे पाठवली होती. अतिशय अद्‌भूत असे ते दृश्य दिसत होते की, काशीच्या भूमीवर अशा प्रकारचे काम होऊ शकते आणि ते ही  अतिशय कमी कालावधीमध्ये होऊ शकते याची प्रचिती येत होती. या प्राचीन शहराच्या साथीने ही आधुनिक इमारत प्राचीन कलाकुसरीची आधुनिक ओळख बनली आहे. अशा शुभ योगासह वस्त्रोद्योगाचे विश्व ही सुध्दा काशीची विशेष ओळख आहे, हस्तकला काशीची ओळख आहे. बोटांच्या तालावर अतिशय शैलीदार पध्दतीने एक नवी वस्तू निर्माण करण्याचे जे सामर्थ्य या भूमीत आहे या सामर्थ्याची ओळख जगाला अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आपल्याकडे जुन्या परंपरेची साधने आहेत, त्यामध्ये बदल आवश्यक आहे. तंत्रज्ञानविषयक बदल करण्याची गरज असते. हस्तक्षेपाची गरज आवश्यक असते. आज काही सहकाऱ्‍यांना मला हातमागाची मदत करण्याची संधी मिळाली. विविध प्रकारच्या कामांसाठी हातमागाचा उपयोग केला जात आहे. त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे, आधुनिक व्यवस्थेमुळे प्रक्रियेमध्ये सुटसुटीतपणा येईल. उत्पन्नही वाढेल. या गोष्टींवर भर देण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण देशात या क्षेत्रात काम करणाऱ्‍यांना एक ओळखपत्र देण्याची मोहीम सुरू आहे. आपल्या देशाकडे इतके सामर्थ्य आहे. मात्र, ते विविध क्षेत्रांमध्ये विखुरलेले आहे. ना त्यांचा कोणताही दस्तावेज सापडत नाही, ना त्यांची ओळख पटवली जाते. आपले सामर्थ्य अशा प्रकारे बेपत्ता. हे सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त प्रमाणात हानिकारक ठरते. ज्याची ओळख निर्माण होते त्याचा एक ब्रँड तयार होतो. असे झाले तर त्याचे मूल्य आपोआपच वाढत जाते. भारतातील गरीबातील गरीब व्यक्ती ज्यांच्याकडे कौशल्य आहे, कसब आहे, काम करण्याची इच्छा आहे त्याची एक ओळख असली पाहिजे, त्याबाबत जागरुकता निर्माण झाली पाहिजे. आपल्या देशात असे कोटी कोटी लोक खऱ्‍या अर्थाने असे आहेत जे ब्रँड आहेत. या ब्रँड्सची ओळख आपण अद्याप जगाला करून देऊ शकलेलो नाही. या ओळखीच्या माध्यमातून त्यांच्या सामर्थ्याला जाणणे, या सामर्थ्याला बळ देणे याच क्षेत्रात विकास करायचा असेल तर लगेच करता येईल. मग चला ही ओळख आहे, यात इतके लोक आहेत. यांच्यासाठी एक योजना बनवूया. त्यांना संधी देऊ या. एकदमच त्या कामाला चालना मिळू शकते. तर मग आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्या व्यक्तींची ओळख करून घेत त्यांच्या सामर्थ्याची चाचपणी करत, त्याचे ब्रँडिंग करत ही जी ओळखपत्र द्यायची योजना आहे त्याची देखील मला संधी मिळाली आहे. जे लोक गालिचे बनवणारे आहेत, त्यांना आधुनिक नव्या मागाच्या साहाय्याने दर्जेदार उत्पादन आंतरराष्ट्रीय पातळीचे उत्पादन करता येईल. ज्यामुळे आपल्या गालिचे निर्यात करण्याच्या सुविधा वाढतील. त्यांना आपण सर्वोत्तमात सर्वोत्तम बनवू शकतो. उत्तमात उत्तम वस्तू बनवून जगाला देऊ शकतो. त्या वितरित करण्याची संधी देखील मला मिळाली आहे. या ठिकाणच्या काही युवकांना मला क्रीडा साहित्य वितरित करण्याची संधीही मिळाली आहे. तसे पाहायला गेले तर ही कुस्तीगीरांची भूमी आहे. मात्र, खेळ आपल्या देशातील युवकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला पाहिजे. आपल्या समाजजीवनाची ओळख बनली पाहिजे. खेळ आहेत म्हणूनच तर आपल्याकडे एक वेगळ्या प्रकारचे वातावरण निर्माण होते. क्रीडापटू सगळ्यांनाच आवडतात. पण खेळाशिवाय खिलाडूवृत्ती निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे खेळांना प्रोत्साहन देणे, युवकांना संधी देणे आणि भारतामध्ये  जे सामर्थ्य आहे आणि विविधता आहे, केवळ एकच खेळ नाही अनेक खेळ आहेत, अनेक प्रकारची कुशलता आहे, त्याला चालना देण्याच्या दिशेने आम्ही लोक प्रयत्न करत आहोत. तुम्हा सर्वांच्या मध्ये अशा विविध प्रकल्पांना समर्पित करण्याची संधी मला मिळाली आहे याचा मला आनंद होत आहे. ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन झाले आहे ते प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण होतील आणि शक्य झाल्यास वेळेच्या आधीच पूर्ण होतील, असा मला विश्वास आहे. हे प्रकल्प वेळेआधीच पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि या भागातील जनतेच्या सेवेसाठी ते समर्पित करू. मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. 

Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
All citizens will get digital health ID: PM Modi

Media Coverage

All citizens will get digital health ID: PM Modi
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 सप्टेंबर 2021
September 28, 2021
शेअर करा
 
Comments

Citizens praised PM Modi perseverance towards farmers welfare as he dedicated 35 crop varieties with special traits to the nation

India is on the move under the efforts of Modi Govt towards Development for all