पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे 9 सप्टेंबर 2023 रोजी जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. ऑक्टोबर 2022 मध्ये पंतप्रधानपदी रुजू झाल्यानंतर पंतप्रधान सुनक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

भारताच्या जी 20 अध्यक्षतेदरम्यान विविध जी 20 बैठका आणि कार्यक्रमांमध्ये उच्च -स्तरीय सहभाग नोंदवत ब्रिटनने दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांनी भारत-ब्रिटन सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी तसेच आराखडा 2030 नुसार द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांतील प्रगती, विशेषत: अर्थव्यवस्था, संरक्षण आणि सुरक्षा, तंत्रज्ञान, हरित तंत्रज्ञान आणि हवामान बदल, आरोग्य आणि गतिशीलता क्षेत्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. उभय नेत्यांनी महत्त्वाच्या आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही आपले विचार मांडले.

दोन्ही नेत्यांनी मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींच्या प्रगतीचाही आढावा घेतला आणि उर्वरित मुद्द्यांवर लवकरच तोडगा निघेल जेणेकरून संतुलित, परस्पर हितावह आणि दूरदर्शी मुक्त व्यापार करार लवकरच पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली.

अधिक विस्तृत चर्चेसाठी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सुनक यांना लवकरच परस्परांच्या सोयीच्या तारखेला द्विपक्षीय भेटीसाठी आमंत्रित केले. पंतप्रधान सुनक यांनी निमंत्रण स्वीकारले आणि यशस्वी जी 20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले.

 

Explore More
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
How Varanasi epitomises the best of Narendra  Modi’s development model

Media Coverage

How Varanasi epitomises the best of Narendra Modi’s development model
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 फेब्रुवारी 2024
February 26, 2024

Appreciation for the Holistic Development of Critical Infrastructure Around the Country