या वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाने आर्थिक विकासाची शाश्वतता आणि दृढता यांच्याप्रति असलेल्या आमची वचनबद्धता अधोरेखित केली
आमची दिशा स्पष्ट आहे, निश्चय स्वच्छ आहे. अधिक तयार करा, अधिक उत्पादन मिळवा अधिकाधिक कनेक्ट व्हा आणि जास्त निर्यात करा
जग आज एका विश्वासार्ह आणि लवचिक उत्पादक भागीदाराच्या शोधात आहे आणि भारताला ही भूमिका निभावण्याची संधी आहे
भारताने अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत, एक संधींचे महाद्वार आपल्यासाठी उघडले गेले आहे आणि अशा परिस्थितीत दर्जाशी तडजोड न करण्याची आपली जबाबदारी आहे
कार्बन कॅप्चर, त्याचा विनियोग आणि साठवणूक महत्वाचे आहे, व्यापार धोरणाच्या मध्यवर्ती शाश्वततेची संकल्पना असणे महत्वाचे आहे :-पंतप्रधान
स्वच्छ तंत्रज्ञानात गुंतणूक करणारे उद्योग हे येत्या काळात नवीन बाजारपेठांमध्ये जाण्याचा चांगला मार्ग तयार करु शकतील:-पंतप्रधान
जागतिक अर्थव्यवस्थेत होत असलेल्या महत्वाच्या बदलांमुळे बाजारपेठा आता फक्त किंमतीला नाही तर शाश्वततेलाही महत्व देतात :-पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्प वेबीनार मालिकेच्या दुसऱ्या भागात संबोधित करताना  “शाश्वत आणि बळकट आर्थिक विकास” या संकल्पनेवर भर दिला. मागील आठवड्यातील प्रगतीचा आढावा घेताना पहिले वेबिनार अतिशय यशस्वी ठरल्याचे आणि त्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत उत्तम सूचना देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सध्याचे वेबिनार हे देशाच्या आर्थिक विकासासाठी सलग बळ देण्याशी संबंधित आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.

जागतिक पुरवठा साखळी वेगळा आकार घेत आहे . भारताची मजबूत अर्थव्यवस्था ही जगासाठी आशेचा किरण बनल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. अर्थव्यवस्थेची मजबूती  व प्रगती ही विकसित भारताचा बळकट पाया आहे असे  मोदी यांनी सांगितले. 

सरकारचा स्वच्छ दृष्टिकोन आणि स्पष्ट संकल्प याबद्दल खात्री देताना पंतप्रधानांनी आपल्या “अधिक निर्मिती करा, अधिक उत्पादन घ्या, अधिक कनेक्ट व्हा आणि अधिक निर्यात करा” या बीजमंत्राचा पुनरुच्चार केला .आपण सध्या करत असलेल्या चर्चेचीआणि त्यामधून येणाऱ्या सूचनांची यात महत्त्वाची भूमिका असेल असे  पंतप्रधानांनी नमूद केले. 

विविध क्षेत्रांमधील समन्वयाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की उत्पादन मालवाहतूक लघु ,सूक्ष्म आणि मध्यम उद्योग तसेच शहरी भागातील केंद्रे हे वेगवेगळे चित्र नसून एकाच आर्थिक संरचनेचे एकमेकांशी जोडलेले खांब आहेत. स्पर्धात्मक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे लवचिकता आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन देते तर उत्पादन मोहीम निर्यातीला बळ देते हे त्यांनी तपशीलवार सांगितले. हे सर्व खांब यावर्षीच्या अर्थसंकल्पातून अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्योग, आर्थिक संस्था आणि राज्य सरकारे यांच्या सक्रिय सहभागाशिवाय निव्वळ धोरणात्मक दिशा योग्य परिणाम साधण्यासाठी अपुरी आहे असा इशारा पंतप्रधानांनी यावेळी दिला. उत्पादन वाढवणे आणि किमतीची संरचना अधिक स्पर्धात्मक करणे यावर संबंधितांनी चर्चेत भर द्यावा अशी सूचना त्यांनी केली या दिशेने केलेल्या तुमच्या सूचना या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील असे श्री मोदी यांनी नमूद केले. 

 

उत्पादन क्षेत्राच्या मुख्य क्षमता दृढ करण्यासाठी आणि त्यातील अडचणी दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न यावेळी  पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दुर्मिळ धातू आढळणाऱ्या मार्गिका आणि कंटेनर उत्पादन यासारख्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यामागे  व्यापार परिसंस्थेला बळकटी देण्याचा उद्देश आहे असे श्री मोदी यांनी अधोरेखित केले. 

अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या बायोफार्मा शक्ती मिशन यावरही प्रधानमंत्री यांनी अधिक प्रकाश टाकला. भारताला   जीवशास्त्र आणि अत्याधुनिक उपचारांसाठीचे जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळावे हे यामागचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक बायोफार्मा संशोधन आणि उत्पादन यात नेतृत्व मिळवण्याच्या दिशेने आपल्याला जायचे आहे असे मोदी यांनी सांगितले.

जागतिक घडामोडींमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी नमूद केले की, जग सध्या वस्तुनिर्माण क्षेत्रात विश्वासार्ह आणि सक्षम भागीदारांच्या शोधात आहे. त्यांनी संबंधित भागधारकांना आत्मविश्वासाने गुंतवणूक करण्याचे,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे, संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्ता मानकांचे पालन करण्याचे आवाहन केले. “ही भूमिका सक्षमपणे पार पाडण्याची संधी भारताकडे आहे,” असे पंतप्रधानांनी ठामपणे अधोरेखित केले.

मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) उल्लेख पंतप्रधानांनी केला.  या करारांमुळे संधींची मोठी कवाडे खुली झाली असून यामुळे  भारतीय उद्योग क्षेत्रावर गुणवत्तेबाबत अधिकाधिक दक्ष राहण्याची  जबाबदारी नव्याने आली आहे. वापरकर्ता-अनुकूल उत्पादने तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पसंती आणि सोयींचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “तरच आपण मुक्त व्यापार करारांद्वारे निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा घेऊ शकू”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

एमएसएमई क्षेत्राच्या संदर्भाने पंतप्रधान म्हणाले की अलीकडील वर्गीकरण सुधारणांमुळे लघुउद्योगांमध्ये विस्ताराबाबतची भीती दूर झाली आहे. सरकार कर्जसुविधा उपलब्ध करून देणे आणि तंत्रज्ञान उन्नतीसाठी मदत करत असताना, खरा परिणाम एमएसएमईंनी जागतिक स्पर्धेत उतरल्यावरच दिसून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  “आता एमएसएमईंनी आपली उत्पादकता आणखी वाढवावी, गुणवत्ता मानके उंचावावीत आणि डिजिटल प्रक्रियांशी तसेच मजबूत मूल्य साखळ्यांशी जोडले जाण्याची वेळ आली आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.

 

पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स, राष्ट्रीय विकास धोरणाचे आधारस्तंभ असून यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी विक्रमी भांडवल खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. हाय-स्पीड रेल्वे, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी आणि जहाज दुरुस्ती सुविधा कार्यक्षमतेसाठी अत्यावश्यक पावले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  “या पायाभूत सुविधांचा खरा लाभ तेव्हाच मिळेल, जेव्हा उद्योग आणि गुंतवणूकदार आपली धोरणे त्यानुसार संरेखित करतील,” असे पंतप्रधान म्हणाले. 

शहरीकरणाबाबत बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की भारताचा भविष्यातील विकास हा शहरांच्या प्रभावी नियोजन आणि व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. द्वितीय आणि तृतीय स्तरीय शहरे विकासाचे नवे आधारस्तंभ कसे बानू शकतात, याबाबत सूचना पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आणि यासंदर्भातल्या सूचना महत्त्वपूर्ण असतील, असे सांगितले. 

पंतप्रधानांनी शाश्वततेकडे होत असलेल्या जागतिक बदलाचा उल्लेख करताना सांगितले की, आज बाजारपेठा केवळ खर्चाकडेच नाही तर पर्यावरणीय परिणामांकडेही लक्ष देत आहेत.'कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज मिशन’ हे  या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे  त्यांनी नमूद केले आणि व्यवसायांना त्यांच्या मुख्य व्यवसाय धोरणांमध्ये स्वच्छ तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचे आवाहन केले. "जे उद्योग वेळेवर स्वच्छ तंत्रज्ञानात गुंतवणूक करतील त्यांना येत्या काळात नवीन बाजारपेठांमध्ये चांगली पोहोच मिळेल," असे पंतप्रधान म्हणाले. 

विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सामुदायिक जबाबदारीचे आवाहन पंतप्रधानांनी केले. सरकारने रूपरेषा पुरवली असून चर्चेपलीकडे जाऊन सामूहिकरीत्या भागीदारीत गती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले."आपली प्रत्येक सूचना आणि प्रत्येक अनुभव  प्रत्यक्ष अंमलबजावणीत उत्कृष्ट परिणाम घडवून आणण्याची क्षमता ठेवतो," असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s Defence Exports Explode: ₹40,000 Crore Milestone Signals a New Manufacturing Era

Media Coverage

India’s Defence Exports Explode: ₹40,000 Crore Milestone Signals a New Manufacturing Era
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s remarks during inauguration of Swaminarayan Hindu Temple in Paris
September 06, 2026

पूज्य महंत स्वामी, फ्रांस सरकार के सम्मानित प्रतिनिधिगण, उपस्थित अतिथिगण, इंडियन कम्युनिटी के मेरे साथी, देश दुनिया से जुड़े सभी हरि भक्त, देवियों और सज्जनों, जय स्वामीनारायण!

आज फ्रांस की राजधानी पेरिस में भव्य स्वामीनारायण मंदिर का लोकार्पण हो रहा है। यह लोकार्पण भारत और फ्रांस के सांस्कृतिक संबंधों का नया युग स्तंभ है। पूज्य संत जनों और सनातन परंपरा के श्रेष्ठ जनों के आशीर्वाद के साथ आज इस लोकार्पण का मंच ‘वसुधैव कुटुम्बकम’ के भाव का मंच बन गया है। भगवान स्वामीनारायण की कृपा और हमारे संतों का स्नेह, संतों का आशीर्वाद, मेरा सौभाग्य है कि मुझे ऐसे पुण्य अवसरों से जुड़ने का अवसर हमेशा मिलता रहता है। आज भी मैं भले ही पेरिस में आप सबके बीच उपस्थित नहीं हूं, लेकिन मन से और हृदय से, मैं स्वयं को आपके बीच ही अनुभव कर रहा हूं।

साथियों,

आज इस अवसर पर मैं परम पूज्य प्रमुख स्वामी जी महाराज का भी श्रद्धापूर्वक स्मरण करता हूं। प्राचीन काल में भारत का जो सांस्कृतिक आध्यात्मिक वैभव था, उन्होंने उसके पुनर्जागरण का एक अभियान शुरू किया था। आज उसका प्रकाश यूरोप समेत पूरी दुनिया में फैल रहा है। 2024 में अबू धाबी में भव्य मंदिर का लोकार्पण हुआ था। आज वहां हजारों लोग दर्शन करने जाते हैं और अब यहां पेरिस में स्वामीनारायण मंदिर का निर्माण सृजन की यह निरंतरता, यह संतों की संकल्प शक्ति का ही प्रमाण है। मैं पुनीत कार्य के लिए पूज्य महंत स्वामी का आभार प्रकट करता हूं, मैं उनके चरणों में प्रणाम करता हूं। मैं BAPS स्वामीनारायण संस्था को और करोड़ों हरि भक्तों को इस अवसर पर हृदय की गहराई से बधाई देता हूं।

साथियों,

BAPS के माध्यम से जब अलग-अलग देश में मंदिरों की प्राण प्रतिष्ठा होती है, तो वहां भारत के प्राचीन विचार और मानवीय मूल्य भी साथ-साथ ही जाते हैं और भारत का विचार कहता है ‘समानं मनः सह चित्तमेषाम्’ अर्थात हमारे मन समान हो, हमारे हृदय साथ जुड़े। इसलिए आज जब फ्रांस में इतना भव्य मंदिर बनकर तैयार हुआ है, यह फ्रांस की विविधता को तो समृद्ध करेगा ही, इससे भारत और फ्रांस के सांस्कृतिक संबंधों को भी ऊर्जा मिलेगी।

साथियों,

बीते वर्षों में भारत और फ्रांस के संबंध नई ऊंचाइयों तक पहुंचे हैं। मेरे मित्र, प्रेसिडेंट मैक्रों के साथ मिलकर दोनों देश एक Special Global Strategic Partnership बना रहे हैं। Technology, AI और Defence से लेकर Space और Climate Action तक हम एक नई गति और नई ऊर्जा के साथ मिलकर के आगे बढ़ रहे हैं। हम 2026 को India-France Year of Innovation के रूप में भी सेलिब्रेट कर रहे हैं। भारत-फ्रांस की ये Strategic Partnership इसलिए भी खास है, क्योंकि ये हमारे पुराने सांस्कृतिक-राजनैतिक सम्बन्धों की मजबूत बुनियाद पर टिकी है। इतिहास गवाह है, फ्रांस में भारतीय सैनिकों के बलिदान का इतिहास आज भी मन-मंदिर में जीवित है। भाषा से जुड़े विषयों में रुचि रखने वाले लोग यह भी जानते हैं कि फ्रेंच स्कॉलर्स ने संस्कृत को लोकप्रिय बनाने में कितनी अहम भूमिका निभाई है। रामकृष्ण परमहंस और स्वामी विवेकानंद पर रोमाँ रोलाँ की की लेखनी हमारी सोसाइटीज़ को और करीब लाई है। पेरिस से पुडुचेरी के अरबिंदो आश्रम तक 'The mother' की spiritual journey, उसने कितने ही भारतीय और फ्रेंच साधकों को inspire किया है।

साथियों,

दशकों पहले श्रील प्रभुपाद स्वामी भी फ्रांस आए थे। इस्कॉन के जरिए भारत फ्रांस के बीच आध्यात्मिक सम्बन्धों का नया अध्याय उन्होंने शुरू किया था। आज योग भी भारत-फ्रांस के people to people कनेक्ट का एक माध्यम बन चुका है। 'इंटरनेशनल योगा डे' पर एफिल टॉवर के सामने से आने वाली तस्वीरें फ्रांस में योग की लोकप्रियता का उदाहरण बनती हैं और अब BAPS के इस भव्य मंदिर के जरिए, हमारे उन सांस्कृतिक सम्बन्धों में एक नया अध्याय जुड़ रहा है।

साथियों,

इन दिनों, भारत फ्रांस Joint Ventures की संभावनाओं पर बातें होती हैं। स्वामीनारायण मंदिर ने इस संभावना में भी एक नया आयाम जोड़ा है। यह मंदिर 'मेड इन इंडिया' है और 'बिल्ट इन फ्रांस' है। इसके काफी पत्थरों को भारत में तराशा गया है। भारत की प्राचीन प्रतिभा यहाँ फ्रांस में आधुनिक इंजीनियरिंग से आकर जुड़ चुकी है। पेरिस में इस भव्य मंदिर ने आकार लिया है। इसलिए, मैं आशा करता हूँ, यह मंदिर सदियों तक भारत और फ्रांस के बीच सहयोग और संभावनाओं का भी प्रतीक बनकर उभरेगा।

साथियों,

स्वामीनारायण मंदिर हमेशा से भक्ति के साथ-साथ सेवा का माध्यम भी रहे हैं। मुझे बताया गया है, यह मंदिर भी सेवा प्रकल्पों का वैसा ही केंद्र बनेगा। मुझे विश्वास है कि यहाँ से भारतीय संस्कृति के जो स्वर निकलेंगे, उनका लाभ पूरे यूरोप में लोगों को मिलेगा। भविष्य में मुझे जब भी समय मिलेगा, मैं इस मंदिर में दर्शन करने का प्रयास अवश्य करूंगा। इन्हीं शब्दों के साथ, एक बार फिर आज के इस लोकार्पण समारोह में सम्मिलित सभी अतिथिगणों को, सभी परिवारों को, सभी हरि भक्तों को और पूरी Indian Diaspora को मेरी ओर से इस शुभारंभ पर्व की ढेरों शुभकामनाएं!

बहुत-बहुत धन्यवाद!

मर्सी बोकू!

जय स्वामीनारायण!