पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्प वेबीनार मालिकेच्या दुसऱ्या भागात संबोधित करताना “शाश्वत आणि बळकट आर्थिक विकास” या संकल्पनेवर भर दिला. मागील आठवड्यातील प्रगतीचा आढावा घेताना पहिले वेबिनार अतिशय यशस्वी ठरल्याचे आणि त्यामध्ये अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अंमलबजावणीबाबत उत्तम सूचना देण्यात आल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सध्याचे वेबिनार हे देशाच्या आर्थिक विकासासाठी सलग बळ देण्याशी संबंधित आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.
जागतिक पुरवठा साखळी वेगळा आकार घेत आहे . भारताची मजबूत अर्थव्यवस्था ही जगासाठी आशेचा किरण बनल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. अर्थव्यवस्थेची मजबूती व प्रगती ही विकसित भारताचा बळकट पाया आहे असे मोदी यांनी सांगितले.
सरकारचा स्वच्छ दृष्टिकोन आणि स्पष्ट संकल्प याबद्दल खात्री देताना पंतप्रधानांनी आपल्या “अधिक निर्मिती करा, अधिक उत्पादन घ्या, अधिक कनेक्ट व्हा आणि अधिक निर्यात करा” या बीजमंत्राचा पुनरुच्चार केला .आपण सध्या करत असलेल्या चर्चेचीआणि त्यामधून येणाऱ्या सूचनांची यात महत्त्वाची भूमिका असेल असे पंतप्रधानांनी नमूद केले.
विविध क्षेत्रांमधील समन्वयाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की उत्पादन मालवाहतूक लघु ,सूक्ष्म आणि मध्यम उद्योग तसेच शहरी भागातील केंद्रे हे वेगवेगळे चित्र नसून एकाच आर्थिक संरचनेचे एकमेकांशी जोडलेले खांब आहेत. स्पर्धात्मक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे लवचिकता आणि नवोन्मेष यांना प्रोत्साहन देते तर उत्पादन मोहीम निर्यातीला बळ देते हे त्यांनी तपशीलवार सांगितले. हे सर्व खांब यावर्षीच्या अर्थसंकल्पातून अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्योग, आर्थिक संस्था आणि राज्य सरकारे यांच्या सक्रिय सहभागाशिवाय निव्वळ धोरणात्मक दिशा योग्य परिणाम साधण्यासाठी अपुरी आहे असा इशारा पंतप्रधानांनी यावेळी दिला. उत्पादन वाढवणे आणि किमतीची संरचना अधिक स्पर्धात्मक करणे यावर संबंधितांनी चर्चेत भर द्यावा अशी सूचना त्यांनी केली या दिशेने केलेल्या तुमच्या सूचना या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील असे श्री मोदी यांनी नमूद केले.

उत्पादन क्षेत्राच्या मुख्य क्षमता दृढ करण्यासाठी आणि त्यातील अडचणी दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न यावेळी पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दुर्मिळ धातू आढळणाऱ्या मार्गिका आणि कंटेनर उत्पादन यासारख्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यामागे व्यापार परिसंस्थेला बळकटी देण्याचा उद्देश आहे असे श्री मोदी यांनी अधोरेखित केले.
अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या बायोफार्मा शक्ती मिशन यावरही प्रधानमंत्री यांनी अधिक प्रकाश टाकला. भारताला जीवशास्त्र आणि अत्याधुनिक उपचारांसाठीचे जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळावे हे यामागचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक बायोफार्मा संशोधन आणि उत्पादन यात नेतृत्व मिळवण्याच्या दिशेने आपल्याला जायचे आहे असे मोदी यांनी सांगितले.
जागतिक घडामोडींमध्ये होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी नमूद केले की, जग सध्या वस्तुनिर्माण क्षेत्रात विश्वासार्ह आणि सक्षम भागीदारांच्या शोधात आहे. त्यांनी संबंधित भागधारकांना आत्मविश्वासाने गुंतवणूक करण्याचे,अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे, संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याचे आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्ता मानकांचे पालन करण्याचे आवाहन केले. “ही भूमिका सक्षमपणे पार पाडण्याची संधी भारताकडे आहे,” असे पंतप्रधानांनी ठामपणे अधोरेखित केले.
मुक्त व्यापार करारांचा (एफटीए) उल्लेख पंतप्रधानांनी केला. या करारांमुळे संधींची मोठी कवाडे खुली झाली असून यामुळे भारतीय उद्योग क्षेत्रावर गुणवत्तेबाबत अधिकाधिक दक्ष राहण्याची जबाबदारी नव्याने आली आहे. वापरकर्ता-अनुकूल उत्पादने तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या पसंती आणि सोयींचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. “तरच आपण मुक्त व्यापार करारांद्वारे निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा घेऊ शकू”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
एमएसएमई क्षेत्राच्या संदर्भाने पंतप्रधान म्हणाले की अलीकडील वर्गीकरण सुधारणांमुळे लघुउद्योगांमध्ये विस्ताराबाबतची भीती दूर झाली आहे. सरकार कर्जसुविधा उपलब्ध करून देणे आणि तंत्रज्ञान उन्नतीसाठी मदत करत असताना, खरा परिणाम एमएसएमईंनी जागतिक स्पर्धेत उतरल्यावरच दिसून येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “आता एमएसएमईंनी आपली उत्पादकता आणखी वाढवावी, गुणवत्ता मानके उंचावावीत आणि डिजिटल प्रक्रियांशी तसेच मजबूत मूल्य साखळ्यांशी जोडले जाण्याची वेळ आली आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.

पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स, राष्ट्रीय विकास धोरणाचे आधारस्तंभ असून यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी विक्रमी भांडवल खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. हाय-स्पीड रेल्वे, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी आणि जहाज दुरुस्ती सुविधा कार्यक्षमतेसाठी अत्यावश्यक पावले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “या पायाभूत सुविधांचा खरा लाभ तेव्हाच मिळेल, जेव्हा उद्योग आणि गुंतवणूकदार आपली धोरणे त्यानुसार संरेखित करतील,” असे पंतप्रधान म्हणाले.
शहरीकरणाबाबत बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की भारताचा भविष्यातील विकास हा शहरांच्या प्रभावी नियोजन आणि व्यवस्थापनाशी जोडलेला आहे. द्वितीय आणि तृतीय स्तरीय शहरे विकासाचे नवे आधारस्तंभ कसे बानू शकतात, याबाबत सूचना पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले आणि यासंदर्भातल्या सूचना महत्त्वपूर्ण असतील, असे सांगितले.
पंतप्रधानांनी शाश्वततेकडे होत असलेल्या जागतिक बदलाचा उल्लेख करताना सांगितले की, आज बाजारपेठा केवळ खर्चाकडेच नाही तर पर्यावरणीय परिणामांकडेही लक्ष देत आहेत.'कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन अँड स्टोरेज मिशन’ हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले आणि व्यवसायांना त्यांच्या मुख्य व्यवसाय धोरणांमध्ये स्वच्छ तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचे आवाहन केले. "जे उद्योग वेळेवर स्वच्छ तंत्रज्ञानात गुंतवणूक करतील त्यांना येत्या काळात नवीन बाजारपेठांमध्ये चांगली पोहोच मिळेल," असे पंतप्रधान म्हणाले.
विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी सामुदायिक जबाबदारीचे आवाहन पंतप्रधानांनी केले. सरकारने रूपरेषा पुरवली असून चर्चेपलीकडे जाऊन सामूहिकरीत्या भागीदारीत गती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले."आपली प्रत्येक सूचना आणि प्रत्येक अनुभव प्रत्यक्ष अंमलबजावणीत उत्कृष्ट परिणाम घडवून आणण्याची क्षमता ठेवतो," असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हमारी दिशा स्पष्ट है... हमारा संकल्प स्पष्ट है...
— PMO India (@PMOIndia) March 3, 2026
Build more, produce more, connect more...Export more: PM @narendramodi
आज दुनिया विश्वसनीय और resilient manufacturing partners की तलाश में है।
— PMO India (@PMOIndia) March 3, 2026
भारत के पास यह अवसर है कि वह इस भूमिका को मजबूती से निभाए: PM @narendramodi
भारत ने बहुत सारे देशों के साथ Free Trade Agreement किए हैं।
— PMO India (@PMOIndia) March 3, 2026
हमारे लिए अवसरों का बहुत बड़ा द्वार खुला है।
ऐसे में हमारी ज़िम्मेदारी है कि हम quality पर कभी भी समझौता न करें: PM @narendramodi
इस दिशा में Carbon Capture, Utilisation and Storage Mission एक महत्वपूर्ण पहल है।
— PMO India (@PMOIndia) March 3, 2026
अब sustainability को आपको core business strategy का हिस्सा बनाना ही होगा।
जो उद्योग समय रहते clean technology में निवेश करेंगे, वे आने वाले वर्षों में नए बाजारों तक बेहतर पहुंच बना पाएंगे: PM
आज दुनिया की अर्थव्यवस्था में एक बड़ा परिवर्तन चल रहा है।
— PMO India (@PMOIndia) March 3, 2026
बाजार अब केवल लागत नहीं देखते, वे sustainability भी देखते हैं: PM @narendramodi


