दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान साने ताकाची यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. 29 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान ताकाची यांच्यासोबत झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर झालेली पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.
सांस्कृतिक संबंध, सामायिक मूल्ये, परस्पर सद्भावना तसेच मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक विभागीय प्रतिबद्धतेवर आधारित प्रादेशिक आणि जागतिक शांतता, समृद्धी आणि स्थिरता यासाठी भारत-जपान भागीदारी अधिक दृढ करण्याच्या बांधिलकीचा दोन्ही नेत्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांनी भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

पंधराव्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय संबंधांमध्ये स्थिरपणे झालेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी दखल घेतली. संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, लघु आणि मध्यम उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्त्वपूर्ण खनिजे, अर्धवाहक, पायाभूत सुविधा विकास, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष आणि परस्पर देवाणघेवाण अशा विस्तृत क्षेत्रात निश्चित केलेल्या परिणामांची जलद अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. त्यांनी भारत आणि जपानमधील धोरणात्मक क्षेत्रातील सहकार्याच्या संधींवर देखील चर्चा केली तसेच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण केली. पंतप्रधान ताकाची यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने आयोजित केलेल्या एआय शिखर परिषदेलाही जोरदार पाठिंबा दर्शविला.
भारत आणि जपान हे एकमेकांचे महत्वाचे भागीदार आणि विश्वासू मित्र आहेत, यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला की प्रादेशिक आणि जागतिक शांतता, समृद्धी आणि स्थिरतेसाठी दोन्ही देशांमधील मजबूत संबंध अपरिहार्य आहेत.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे आणि लवकरात लवकर पुन्हा भेट घेण्याचे मान्य केले.
Had a productive meeting with Prime Minister Sanae Takaichi of Japan. We discussed ways to add momentum to bilateral cooperation in areas such as innovation, defence, talent mobility and more. We are also looking to enhance trade ties between our nations. A strong India-Japan… pic.twitter.com/4UexmElSwQ
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2025


