पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंध महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंशी संवाद साधला, त्यावेळी खेळाडूंनी स्पर्धेतील त्यांचे अनुभव सामायिक केले.





एक्स वरील संदेशात पंतप्रधान मोदी म्हणाले:
“अंध महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे स्वागत करणे ही आनंददायी बाब होती. त्यांनी त्यांचे अनुभव सामायिक केले, जे खरोखरच खूप प्रेरणादायी होते.”
It was a delight to host the Indian Blind Women’s Cricket Team that won the Blind Women’s T20 World Cup! They shared their experiences, which were very inspiring indeed. pic.twitter.com/ar6SuQWHC9
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2025


