युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समितीच्या विसाव्या सत्राला भारतात प्रारंभ झाल्याबद्दल पंतप्रधानांनी  आनंद व्यक्त केला आहे. जगभरातील जागत्या परंपरांना संरक्षित आणि लोकप्रिय करण्याचा  सामायिक दृष्टिकोन असणारे जवळपास 150 हून जास्त देशांमधले  प्रतिनिधी  या चर्चासत्राला आले आहेत असे त्यांनी सांगितले. 

ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होत असलेल्या या महत्त्वाच्या उपक्रमाचे आतिथ्य करताना भारताला विशेष आनंद होत आहे असे पंतप्रधानांनी  सांगितले. समुदाय आणि पिढ्यांना जोडणाऱ्या संस्कृतीची शक्ती अधिक दृढ करण्याच्या भारताच्या निर्धाराचे प्रतिबिंब या कार्यक्रमातून  दिसून येते असे पंतप्रधानांनी सांगितले. 

एक्स या समाज माध्यमावर दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे -

“अमूर्त सांस्कृतिक वारसा यावरील युनेस्को समितीच्या विसाव्या सत्राला भारतात सुरुवात होत आहे ही मोठी आनंदाचीच गोष्ट आहे. आपल्या सामायिक जागत्या  परंपरा संरक्षित आणि लोकप्रिय व्हाव्यात हा दृष्टिकोन  असणाऱ्या मान्यवरांना या चर्चासत्राने  जवळपास दीडशे राष्ट्रांमधून एकत्र आणले आहे.या उपक्रमाचे, विशेषतः ते लाल किल्ल्यावर होत असल्याने त्याचे आतिथ्य करताना भारताला अतिशय आनंद होत आहे. यातून समुदाय आणि पिढ्यांना जोडण्याऱ्या संस्कृतीचे बळ वाढवण्यासाठीची आमची वचनबद्धता प्रतीत होते.

@UNESCO”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
ET@Davos 2026: ‘India has already arrived, no longer an emerging market,’ says Blackstone CEO Schwarzman

Media Coverage

ET@Davos 2026: ‘India has already arrived, no longer an emerging market,’ says Blackstone CEO Schwarzman
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 23 जानेवारी 2026
January 23, 2026

Viksit Bharat Rising: Global Deals, Infra Boom, and Reforms Propel India to Upper Middle Income Club by 2030 Under PM Modi