पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांचे त्यांच्या पुनर्निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वेसोबत विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला.
समाज माध्यम ‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:
"पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांचे पुन्हा निवडून आल्याबद्दल अभिनंदन. सर्व क्षेत्रांमध्ये भारत-नॉर्वे भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करत राहण्यास आपण उत्सुक आहे.”
Congratulations to Prime Minister Jonas Gahr Støre on his re-election. I look forward to continue working closely together to further strengthen the India-Norway partnership in all areas.@jonasgahrstore
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2025


