पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.
पंतप्रधान कार्यालयाच्या 'X' हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे:
“उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे झालेल्या रस्ते अपघातातील जीवितहानीमुळे दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ दे.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi”
Saddened by the loss of lives due to a road accident in Pithoragarh, Uttarakhand. Condolences to those who have lost their loved ones in the mishap. May the injured recover soon.
— PMO India (@PMOIndia) July 15, 2025
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The…


