प्रसिद्ध हिंदी साहित्यिक पंडित हरिराम द्विवेदी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. 'अंगनइया' आणि 'जीवनदायिनी गंगा' यासारखे काव्यसंग्रह आणि विविध रचनांसह, ते कायम आपल्यात राहतील, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्स संदेशात लिहिले आहे;
“हिंदी साहित्यातील महान साहित्यिक आणि काशी निवासी पंडित हरिराम द्विवेदी जी यांच्या निधनाने दु:ख झाले. अंगनइया आणि जीवनदायिनी गंगा यासारखे काव्यसंग्रह आणि विविध रचनांसह, ते कायम आपल्यात राहतील. त्यांना श्रीचरणी स्थान मिळावे, हीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना.”
हिंदी साहित्य के मूर्धन्य रचनाकार और काशी के निवासी पंडित हरिराम द्विवेदी जी के निधन से दुखी हूं। अंगनइया और जीवनदायिनी गंगा जैसे कविता संग्रहों और अपनी विभिन्न रचनाओं के साथ, वे हमेशा हमारे जीवन में उपस्थित रहेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2024
उन्हें श्रीचरणों में स्थान मिले, ईश्वर से मेरी यही प्रार्थना…


