India-France strategic partnership may be just 20 years old but spiritual partnership between both countries exists since ages: PM
India and France have strong ties in defence, security, space and technology sectors: PM Modi
India welcomes French investments in the defence sector under the #MakeInIndia initiative: PM Modi

मोनामी मिस्यु ल प्रेसिदों मेक्रों,

सन्माननीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य,

प्रसार माध्यमे,

नमस्कार.

            मी अध्यक्ष मेक्रों याचे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात सहर्ष हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रपती जी, गेल्या वर्षी काही महिन्यांपूर्वी तुम्ही पॅरिसमध्ये मोकळ्या मनाने आणि आलिंगन देऊन माझे स्वागत केले होते. मला खुप आनंद होत आहे की आज मला भारत भुमीवर तुमचे स्वागत करण्याची संधी मिळाली.

अध्यक्ष महोदय,

तुम्ही आणि मी इथे एकत्र उभे आहोत. आपण दोघे केवळ दोन सशक्त, स्वतंत्र देशांचे आणि दोन वैविध्यपूर्ण लोकशाहींचे नेते म्हणून नाही, तर आपण दोघे समृद्ध आणि समर्थ वारसांच्या उत्तराधिकारी आहोत.

आपली धोरणात्मक भागिदारी भले 20 वर्ष जूनी असेल, मात्र आपले देश आणि आपल्या संस्कृतींची धार्मिक भागिदारी शतकांपासून आहे.

18व्या शतकापासून आतापर्यंत, पंचतंत्रच्या कथांद्वारे, वेद, उपनिषद, रामकृष्ण आणि श्री अरबिंद यांच्या सारख्या महापुरुषांच्या महाकाव्यांच्या माध्यमातून, फ्रेंच विचारवंतांनी भारताच्या आत्म्यामध्ये डोकावून पाहिले आहे. वोल्तेय (Voltaire), विक्टर ह्युगो, रोमा रोला, रेने दौमाल, आंद्रे मलरो यांच्यासारख्या असंख्य युगप्रवर्तकांना भारताच्या दर्शनात आपल्या विचारसरणी पूरक आणि प्रेरक आढळल्या आहेत.

अध्यक्ष महोदय,

आज आपली भेट ही केवळ दोन देशांच्या नेत्यांची भेट नाही, तर दोन समान विचारांच्या संस्कृती आणि त्यांच्या समग्र वारसांचा संगम आहे. हा योगायोग नाही कारण स्वातंत्र्य, समानता यांचा आवाज केवळ फ्रान्समध्येच नाही, तर भारताच्या संविधानातही आहे. आपल्या दोन्ही देशांचे समाज याच मुल्यांच्या पायावर उभे आहे. या मुल्यांसाठी आपल्या शुर सैनिकांनी दोन जागतिक युद्धांमधे आपली आहुती दिली आहे.

मित्रांनो,

फ्रान्स आणि भारताच्या एका मंचावरील उपस्थिती ही एक समावेशक खुल्या आणि समृद्ध व शांततामय जगासाठी सोनेरी संकेत आहे. आपल्या दोन्ही देशांची स्वायत्त आणि स्वतंत्र परदेश धोरणे केवळ परस्परांच्या हिताची नाहीत, आपल्या देशवासियांच्या हिताची नाहीत, तर सार्वभौम मानवी मुल्यांवर देखिल आधारीत आहेत. आणि आज जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी जर कोणतेही दोन देश खांद्याला खांदा मिळवून चालू शकत असतील, तर ते आहेत, भारत आणि फ्रान्स. अध्यक्षजी, तुमच्या नेतृत्वाने ही जबाबदारी सोपी केली आहे. 2015 मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा शुभारंभ झाला होता, तो पॅरिसमध्ये फ्रान्सच्या अध्यक्षांसमवेत झाला होता. उद्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी परिषदेचे आयोजन हे समान जबाबदाऱ्यांच्या प्रती आपल्या कार्यशील जागरुकतेचे ज्वलंत उदाहरण आहे. मला आनंद होत आहे की हे शुभकार्य फ्रान्सच्या अध्यक्षांसमवेतच होत आहे.

मित्रांनो,

संरक्षण, सुरक्षा, अंतराळ आणि उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि फ्रान्सच्या द्विपक्षीय सहकार्याचा इतिहास खुप मोठा आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांबाबत सहमती आहे. सरकार कोणाचेही असो, आपल्या संबंधांचा आलेख केवळ आणि केवळ उंचच जातो. आजच्या आपल्या चर्चेत जे निर्णय घेण्यात आले, त्यांची एक ओळख तुम्हाला आत्ताच झालेल्या करांरांमधून झाली आहे आणि म्हणूनच मी केवळ तीन विशिष्ट विषयांवर माझे विचार मांडू इच्छितो. पहिला, संरक्षण क्षेत्रात आमचे संबंध खुप दृढ आहेत आणि आम्ही फ्रान्सला सर्वात विश्वसनीय संरक्षण भागिदारांपैकी एक मानतो. आमच्या सैन्यांच्या सर्व विभागांमधून विचार विनिमय आणि युद्ध सराव नियमितपणे होत असतो. संरक्षण सामुग्री आणि उत्पादन क्षेत्रांत आमचे संबंध मजबूत आहेत. संरक्षण क्षेत्रात फ्रान्सद्वारे ‘मेक इन इंडियाच्या’ कटिबद्धतेचे आम्ही स्वागत करतो.

आज आमच्या सैन्यांमध्ये परस्पर लॉजिस्टिक सहकार्याच्या कराराला मी आमच्या घनिष्ट संरक्षण सहकार्याच्या इतिहासात एक सोनेरी पाऊल मानतो. दुसरे, आम्हा दोघांच्या मते भविष्यात जगात सुख-शांती, प्रगती आणि समृद्धीसाठी भारतीय हिंद महासागर क्षेत्राची खुप महत्वपूर्ण भूमिका असेल. पर्यावरण, सागरी सुरक्षा, सागरी संसाधने किंवा दिशादर्शक आणि ओव्हरफ्लाईटचे स्वातंत्र्य या सर्व विषयांवर आम्ही आमचे सहकार्य मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि म्हणूनच आज आम्ही हिंद महासागर क्षेत्रात आमच्या सहकार्यासाठी एक संयुक्त धोरणात्मक दृष्टिकोन प्रसिद्ध करत आहोत.

आणि तिसरे, आमच्या मते आमच्या द्विपक्षीय संबंधांच्या उज्वल भविष्यासाठी लोकांमधील परस्पर संबंध विशेषत: आमच्या युवकांमधील संबंध हा महत्वपूर्ण आयाम आहे. आमच्या युवकांनी एकमेकांच्या देशाबद्दल जाणून घ्यावे, एकमेकांच्या देशांना भेटी द्याव्या, तिथे रहावे, तिथे काम करावे, जेणे करुन आमच्या संबंधांसाठी हजारो दूत तयार होतील, अशी आमची इच्छा आहे आणि म्हणूनच आज आम्ही दोन महत्वपूर्ण करार केले आहेत. पहिला करार, परस्परांच्या शिक्षण पात्रतेला, मान्यता देण्याचा आहे आणि दुसरा आमच्या स्थलांतरण आणि मोबिलीटी भागिदारीचा आहे. हे दोन्ही करार आमच्या देशवासियांमध्ये आमच्या युवकांमध्ये दृढ नात्याची चौकट तयार करेल.

मित्रांनो,

आमच्या संबंधांचे अन्य अनेक आयाम आहेत. सगळ्यांचा उल्लेख केला तर संध्याकाळ होईल. रेल्वे, शहरी विकास, पर्यावरण, सुरक्षा, अंतराळ, म्हणजेच जमिनीपासून आकाशापर्यंत असा कोणताही विषय नाही, ज्यावर आम्ही एकत्रितपणे काम करत नाही. आंतरराष्ट्रीय मंचावर देखील आम्ही सहकार्य आणि समन्वयाने काम करतो. आफ्रिकी देशांबरोबर भारत आणि फ्रान्सचे मजबूत संबंध आहेत. आमच्या सहकार्याचा आणखी एक आयाम विकसित करण्यासाठी तो एक मजबूत आधार प्रदान करतो. उद्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या परिषदेचे सहअध्यक्ष पद, अध्यक्ष मेक्रों आणि मी भूषवणार आहोत. आमच्याबरोबर अन्य अनेक देशांचे राष्ट्रपती, अध्यक्ष आणि मंत्री गण देखील उपस्थित राहतील. पृथ्वीच्या भविष्यासाठी आम्ही सर्व आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या यशासाठी कटिबद्ध आहोत.

अध्यक्ष जी, मला आशा आहे की, परवा वाराणसीमध्ये तुम्हाला भारताच्या प्राचीन आणि चिरकालीन आत्म्याची अनुभूती होईल. ज्याच्या तरलतेने भारताची संस्कृती जोपासली आहे आणि जिने फ्रान्सच्या अनेक विचारवंत, साहित्यिक आणि कलाकारांना देखील प्रेरीत केले आहे. आगामी दोन दिवसात अध्यक्ष मेक्रों आणि मी विचारांचे आदान-प्रदान सुरुच ठेवू. मी पुन्हा एकदा अध्यक्ष मेक्रों यांचे आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो.

खूप खूप धन्यवाद.

य वू रेमर्सि

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence

Media Coverage

PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 जानेवारी 2026
January 12, 2026

India's Reforms Express Accelerates: Economy Booms, Diplomacy Soars, Heritage Shines Under PM Modi