जलस्रोत व्यवस्थापन आणि संधारण या क्षेत्रासह समुदायांसाठी राबवण्यात येणाऱ्या भारताच्या परिवर्तनात्मक उपक्रमांची साबा कोरोसी यांनी केली प्रशंसा
जागतिक संस्थांमधल्या सुधारणांसाठीच्या प्रयत्नात भारत आघाडीवर असल्याचे महत्व साबा कोरोसी यांनी केले अधोरेखित
जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित संयुक्त राष्ट्र महासभेच्या दृष्टिकोनाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
समकालीन भू-राजकीय वास्तविकता खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित होण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह बहुपक्षीय प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी दिला भर

संयुक्त राष्ट्र महासभेच्या (पीजीए) 77 व्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान, साबा कोरोसी यांनी जलस्रोत  व्यवस्थापन आणि संधारण  क्षेत्रासह समुदायांसाठी राबवण्यात येणाऱ्या  भारताच्या परिवर्तनात्मक उपक्रमांची प्रशंसा केली. सुधारित बहुपक्षीयतेच्या दिशेने भारताच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत, कोरोसी यांनी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत आघाडीवर असल्याचे महत्त्व अधोरेखित केले.

पदभार स्वीकारल्यानंतर भारताचा पहिलाच  द्विपक्षीय दौरा केल्याबद्दल पंतप्रधानांनी साबा कोरोसी यांचे आभार मानले. जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित  साबा कोरोसी यांच्या दृष्टिकोनाची  त्यांनी प्रशंसा केली.  संयुक्त राष्ट्र  2023 जल परिषदेसह 77 व्या संयुक्त राष्ट्र महासभे दरम्यान  कोरोसी यांच्या  अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील उपक्रमांना भारताचा  पूर्ण पाठिंबा असल्याचे आश्वासन  त्यांनी साबा कोरोसी यांना  दिले.

समकालीन भू-राजकीय वास्तविकता खऱ्या अर्थाने  प्रतिबिंबित व्हावी या दृष्टीने  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह बहुपक्षीय प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Record demand for made-in-India cars

Media Coverage

Record demand for made-in-India cars
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology