शेअर करा
 
Comments
PMNCH Delegation presents the logo for the 2018 Partners’ Forum to Prime Minister Modi
PM Modi suggests PMNCH delegation to involve young people in important issues like nutrition, age of marriage, pre-natal & post-natal care
PM Modi asks for ideas from PMNCH for effective implementation & communication for programmes for women, children and adolescents

मातृ, नवजात शिशू आणि बाल आरोग्य (पीएमएनसीएच) भागीदारीच्य प्रतिनिधी मंडळासोबत पीएमएनसीएच भागीदारी परिषदेचे तीन चॅम्पियन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा, चिलीचे माजी राष्ट्रपती आणि पीएमएनसीएचचे भावी अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेत्री तसेच युनिसेफची सद्‌भावना राजदूत प्रियंका चोप्रा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री ए.के.चौबे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रिती सुदान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन 12-13 डिसेंबर 2018 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या भागीदारी परिषद 2018 चे आमंत्रण दिले. या परिषदेत विविध देशांचे प्रमुख आणि आरोग्य मंत्र्यांसह 1200 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पीएमएनसीएच ही 92 देश आणि 1000हून अधिक संघटनांची एक वैश्विक भागीदारी आहे. पंतप्रधानांनी या परिषदेला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. तसेच परिषदेच्या बोधचिन्हाचा स्वीकार केला.

 

डॉ. मिशेल बाचलेट यांनी या भागीदारीचे महत्व सांगितले आणि महिला सक्षमीकरण, मुलं आणि युवकांच्या विकासातील आव्हाने पेलण्यासाठी पंतप्रधानांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. पंतप्रधानांनी यावेळी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले. गावांमधील गरीब आणि गर्भवती महिलांना सकस आहार मिळावा यासाठी त्यांनी गुजरातमध्ये खासगी क्षेत्र आणि संघटनांसोबत भागीदारी केली. त्यांनी प्रभावी दळणवळण धोरणावर जोर दिला. तसेच त्यांनी हे देखील सांगितले की, ‘भागीदारीच भागीदारी’ आहे. सकस आहार, लग्नाचे वय, बाळंतपणापूर्वी आणि नंतरची काळजी तसेच महिला, मुलं आणि नवजात शिशूसाठीच्या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागतिक स्तरावरील लोकांकडून विशेषत: युवकांकडून कल्पना आणि सूचना मागवल्या पाहिजेत. या सर्व विषयांवर ऑनलाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करून डिसेंबर 2018 च्या भागीदारी परिषदेत या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक वितरित केली जावीत अशी सूचना पंतप्रधानांना यावेळी केली.

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Forex reserves surge by $58.38 bn in first half of FY22: RBI report

Media Coverage

Forex reserves surge by $58.38 bn in first half of FY22: RBI report
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मिडिया कॉर्नर 28 ऑक्टोबर 2021
October 28, 2021
शेअर करा
 
Comments

Citizens cheer in pride as PM Modi addresses the India-ASEAN Summit.

India appreciates the various initiatives under the visionary leadership of PM Modi.