PM visits International Rice Research Institute in Philippines

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपीन्समधील लॉस बानोस स्थित इंटरनॅशनल राईस रिसर्च  इनिस्टटयूटला (आयआरआरआय) भेट दिली. आयआरआरआय ही प्रमुख संशोधन संस्था अहे, जी तांदूळ विज्ञान, भाताची शेती करणाऱ्यांचे आणि ग्राहकांचे आरोग्य सुधारणे आणि भावी पिढीसाठी भात शेती पर्यावरण संरक्षणाच्या माध्यमातून दारिद्रय आणि उपासमारी कमी करण्यासाठी समर्पित  आहे.

पुराच्या पाण्यातदुष्काळी स्थितीत तसेच क्षारयुक्त पाण्यात तग धरु शकणाऱ्या तांदळाच्या जाती दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिलीआणि महिला शेती सहकारी संस्थांबरोबर आयआरआरआय करत असलेल्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.

पाण्याच्या वेढयात तग धरु शकणाऱ्या तांदळाच्या जातींसाठी नवीन भूखंडाचे प्रतीकात्मक भूमीपूजन पंतप्रधानांनी केले. नरेंद्र मोदी रिसायलिंएट राईस फिल्ड प्रयोग शाळेचे उद्‌घाटनही त्यांनी केले. त्यांनी आयआरआरआय जनुके बँकेला दोन भारतीय तांदळाच्या जातीची बियाणेही भेट दिली.

या भेटीदरम्यानपंतप्रधानांनी आयआरआरआयमध्ये काम करणाऱ्या अनेक भारतीय वैज्ञानिकांशी संवाद साधला.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Why Abrogation Of Article 370 Was A Strategic Necessity For India

Media Coverage

Why Abrogation Of Article 370 Was A Strategic Necessity For India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 05 ऑगस्ट 2026
August 05, 2026

Viksit Bharat in Action: Inclusive, Green, and Globally Competitive Under PM Modi