PM Modi to visit Gujarat, inaugurate Ro-Ro Ferry Service between Ghogha and Dahej
PM Modi to inaugurate the Sarvottam Cattle Feed Plant of Shree Bhavnagar District Cooperative Milk Producers Union Ltd
PM Modi in Vadodara: To dedicate Vadodara City Command Control Centre; the Waghodiya Regional Water Supply Scheme
PM to hand over keys of houses to beneficiaries under the PMAY, lay foundation stone & launch key development projects

घोघा येथे एका सभेत पंतप्रधान घोघा आणि दहेज दरम्यान रो-रो फेरी सेवेच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करतील. या फेरी सेवेमुळे सौराष्ट्रमधील घोघा आणि दक्षिण गुजरातमधील दहेज दरम्यान प्रवासाचा वेळ सात ते आठ तासांवरून केवळ एका तासापर्यंत इतका कमी होणार आहे. पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर यातून वाहनांचीही वाहतूक करता येईल. रविवारी पंतप्रधान पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन करतील जो प्रवासी वाहतुकीसाठी आहे. पंतप्रधान घोघा ते दहेज दरम्यान पहिल्या फेरीसेवेतून प्रवास करतील. त्यांनतर दहेज येथे एका जनसभेला संबोधित करतील.

तसेच घोघा येथे एका जनसभेत पंतप्रधान श्री भावनगर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सर्वोत्तम पशु आहार संयंत्रचा शुभारंभ करतील.

दहेज इथून पंतप्रधान वडोदऱ्याला जातील. तिथे एका जनसभेत ते वडोदरा सिटी कमांड नियंत्रण केंद्र, वाघोडीया प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि बँक ऑफ बडोद्याची नवी मुख्यालय इमारत राष्ट्राला समर्पित करतील.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (शहरी आणि ग्रामीण) लाभार्थ्यांना पंतप्रधान घरांच्या चाव्या सुपूर्द करतील. एकात्मिक वाहतूक केंद्र, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, गृहनिर्माण प्रकल्प आणि उड्डाणपुलासह अनेक पायाभूत आणि विकास प्रकल्पांचे भूमिपूजन ते करतील. तसेच वडोदरा येथे मुंद्रा-दिल्ली पेट्रोलियम उत्पादन पाईपलाइनच्या क्षमता विस्ताराचे आणि एचपीसीएलच्या ग्रीनफिल्ड मार्केटिंग टर्मिनल प्रकल्पाचे भूमिपूजनही ते करतील.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's banking sector resilient; 11-13% credit growth for January-June likely: Survey

Media Coverage

India's banking sector resilient; 11-13% credit growth for January-June likely: Survey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 एप्रिल 2026
April 20, 2026

Honouring Saints, Powering Futures: PM Modi’s Leadership That Blends Heritage, Highways and High Growth