शेअर करा
 
Comments

जागतिक जैवइंधन दिवसानिमित्त उद्या नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी, खासदार, अधिकारी यांना ते संबोधित करतील.

कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात जैवइंधने साहाय्यकारी ठरु शकतात. स्वच्छ पर्यावरण, शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती यामध्ये जैवइंधने मोलाचे योगदान देऊ शकतात. म्हणूनच स्वच्छ भारत आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसंदर्भातील उपक्रमासह विविध सरकारी उपक्रमांमध्ये जैवइंधनाला स्थान देण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या समावेशाचे प्रमाण वाढले आहे. 2013-14 इथेनॉल पुरवठा वर्षात ते 38 कोटी लीटर होते. 2017-18 इथेनॉल पुरवठा वर्षात ते अंदाजे 141 कोटी लीटरवर पोहोचले आहे. सरकारने जून 2018 मधील राष्ट्रीय जैवइंधने धोरणालाही मान्यता दिली आहे.

 

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
Forex reserves surge by $58.38 bn in first half of FY22: RBI report

Media Coverage

Forex reserves surge by $58.38 bn in first half of FY22: RBI report
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
जम्मू आणि काश्मीरमध्ये रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
October 28, 2021
शेअर करा
 
Comments
मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह मदत केली मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये डोडा  येथील थात्री जवळ रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून सानुग्रह मदतही मंजूर केली  आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

"जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथील थात्री जवळ झालेल्या रस्ते अपघातामुळे मी दु:खी झालो आहे. या दुःखद प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबांप्रती  शोक  संवेदना व्यक्त करतो.

जे लोक जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे होवोत  अशी मी प्रार्थना करतो:  पंतप्रधान  @narendramodi

जम्मू आणि काश्मीरमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय  मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील.: पंतप्रधान @narendramodi"