PM’s statement prior to his departure to Davos

दावोस दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन पुढीलप्रमाणे :-

भारताचे चांगले मित्र आणि जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक प्रा. क्लाउस श्वाब यांच्या निमंत्रणावरुन दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत प्रथमच सहभागी होत असून मी उत्सुक आहे. यावर्षीच्या परिषदेची संकल्पना “दुभंगलेल्या जगात समाईक भवितव्याची निर्मिती” असून ती अगदी समर्पक आणि योग्य आहे.

समकालीन आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि जागतिक प्रशासन व्यवस्थेसमोरील सध्याची आणि आगामी आव्हानांकडे जगभरातील नेते, सरकार, धोरणकर्ते, उद्योग आणि नागरी समाज यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

गेल्या काही वर्षात, बाहय जगताबरोबर भारताचे संबंध खरोखरच बहुआयामी बनले आहेत, ज्यात राजकीय, आर्थिक, परस्पर नागरिक संवाद, संरक्षण आणि अन्य क्षेत्रांचा समावेश आहे. दावोसमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर भारताच्या भावी संबंधांबाबत माझ्या कल्पना मांडण्यासाठी मी उत्सुक आहे.

जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यक्रमांव्यतिरिक्त, स्वीस महांसघाचे अध्यक्ष महामहीम अलेन बर्सेट आणि स्वीडनचे पंतप्रधान महामहीम स्टिफन लोव्हेन यांच्याबरोबर मी स्वतंत्रपणे द्विपक्षीय बैठका घेणार आहे.

मला विश्वास वाटतो की, या द्विपक्षीय बैठका फलदायी ठरतील आणि या देशांबरोबर आपल्या संबंधांना चालना मिळेल आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील.”

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vande Bharat AC chair car fares much lower than those in China, Japan, France: Railway Minister Ashwini Vaishnaw

Media Coverage

Vande Bharat AC chair car fares much lower than those in China, Japan, France: Railway Minister Ashwini Vaishnaw
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 फेब्रुवारी 2026
February 12, 2026

Sustainable, Strong, and Global: India's 2026 Surge Under PM Modi's Transformative Leadership