PRAGATI: PM Modi reviews progress towards handling and resolution of grievances related to Railways
PRAGATI: PM calls for strictest possible action against Railway officials found guilty of corruption
PRAGATI: PM Modi reviews the progress of vital infrastructure projects in the railway, road and power sectors
Mission Indradhanush: PM asks for targeted attention in strict timeframes for the 100 worst performing districts

तत्पर प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणीसाठीच्या बहुआयामी ‘प्रगती’ या मंचाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.

रेल्वे विषयक तक्रारी हाताळण्यासंदर्भातल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. अधिकाऱ्यांसंदर्भात भ्रष्टाचाराच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात आल्याची दखल घेऊन, भ्रष्टाचाराबाबत दोषी आढळणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. अपघातानंतरच्या मदतीसाठीच्या दूरध्वनी क्रमांकसहीत सर्व तक्रारी आणि चौकशीसाठी एकत्रित एकच दूरध्वनी क्रमांक ठेवण्यासंदर्भात रेल्वेने लक्ष घालावे, असेही त्यांनी सूचवले.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओदिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि नागालँड यासह विविध राज्यातल्या रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रासह महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला.

मुंबई मेट्रो, तिरुपती-चेन्नई महामार्ग, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमधले प्रलंबित रस्ते प्रकल्प, जम्मू-काश्मीर आणि ईशान्यकडच्या महत्वाच्या विद्युत पारेषण वाहिन्या याबाबतही पंतप्रधानांनी माहिती घेतली. बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठीच्या इंद्रधनुष्य अभियानाचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. याबाबत फारशी प्रगती न झालेल्या 100 जिल्ह्यांमध्ये नियोजित वेळेतच उद्दिष्टपूर्ती गाठण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. एकही बालक लसीविना राहू नये, याची खातरजमा करण्यासाठी राष्ट्रीय छात्र संघटना आणि नेहरु युवा केंद्रासारख्या युवक संस्थांना सहभागी करुन घेता येईल, असेही त्यांनी सुचविले.


स्वच्छता कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतांना स्वच्छता पंधरवड्यांना चळवळीचे स्वरुप द्यावे, असेही ते म्हणाले. एलईडी बल्ब सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे त्यांनी अमृत अभियानाचा आढावा घेतांना अधिकाऱ्यांना सुचविले.

2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्यांच्या 75व्या वर्षापर्यंत परिवर्तन घडविण्यासाठी ठोस आराखडा आणि उद्दिष्ट घेऊन पुढे या असे आवाहन त्यांनी सर्व सचिव राज्यांच्या मुख्य सचिवांना केले. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती दिनी 2019 पर्यंत स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Since 2019, a total of 1,106 left wing extremists have been 'neutralised': MHA

Media Coverage

Since 2019, a total of 1,106 left wing extremists have been 'neutralised': MHA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 डिसेंबर 2025
December 13, 2025

PM Modi Citizens Celebrate India Rising: PM Modi's Leadership in Attracting Investments and Ensuring Security