PM Modi reviews progress towards beginning of GST to be rolled out on July 1
GST is a turning point for the economy, unprecedented in history: PM Modi
The creation of One Nation; One Market; One Tax would greatly benefit the common man: Prime Minister Modi

येत्या एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबंधित स्थितीचा आढावा घेतला.

अडीच तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या या बैठकीत केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्यासह वित्त मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयातले वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रिमंडळ सचिव उपस्थित होते.

बैठकी दरम्यान पंतप्रधानांनी वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात आयकर, मनुष्यबळ, अधिकारी प्रशिक्षण, तक्रार निवारण यंत्रणा तसेच संनियंत्रण अशा विविध बाबींचा आढावा घेतला. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान संबंधी पायाभूत सुविधा, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, बँकांशी समन्वय तसेच विद्यमान करदात्यांची नोंदणी अशी सर्व कामे एक जुलैपूर्वी पूर्ण होतील, अशी माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. माहिती सुरक्षा यंत्रणेबाबतही यावेळी तपशीलवार चर्चा झाली. या संदर्भातल्या विचारणांना उत्तरे देण्यासाठी - @askGst_GOI हे ट्विटर हॅन्डल सुरु करण्यात आले आहे. तसेच देशभरात टोल फ्री असणारा 1800-1200-232 हा दूरध्वनी क्रमांकही सक्रीय करण्यात आला आहे.

येत्या एक जुलैपासून देशात वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होत आहे. राजकीय पक्ष तसेच व्यापार आणि उद्योगांसह सर्व भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिपाक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी ही देशाच्या अर्थकारणाला नवे वळण देणारी तसेच ऐतिहासिक अभूतपूर्व घटना असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “एक देश – एक बाजारपेठ” – एक कर या रचनेतून सर्वसामान्य नागरिकाला सर्वाधिक लाभ मिळावा असे निर्देश पंतप्रधानांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित माहिती तंत्रज्ञान यंत्रणेच्या सायबर सुरक्षेकडे सर्वाधिक लक्ष दयावे, असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.  

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India vehicle retail sales seen steady in December as tax cuts spur demand: FADA

Media Coverage

India vehicle retail sales seen steady in December as tax cuts spur demand: FADA
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 9 डिसेंबर 2025
December 09, 2025

Aatmanirbhar Bharat in Action: Innovation, Energy, Defence, Digital & Infrastructure, India Rising Under PM Modi