पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इस्रायलचे पंतप्रधान नाफ्ताली बेनेट यांच्याशी फोनवरून चर्चा केली.या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधानपद मिळाल्याबद्दल बेनेट यांचे पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा अभिनंदन केले.
गेल्या काही वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय हितसंबंधांचा लक्षणीय विकास झाल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी संतोष व्यक्त केला. शेती, पाणी, संरक्षण आणि सुरक्षा तसेच सायबर सुरक्षा या क्षेत्रांमध्ये भारत इस्रायल सोबतच्या आपल्या दृढ सहकार्याचे मोल जाणतो यावर पंतप्रधानांनी भर दिला.
इतर क्षेत्रातही विशेषतः उच्च तंत्रज्ञान आणि संशोधन अशा क्षेत्रांमध्ये हे सहकार्य अजून दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली.
या दिशेने काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. भारत- इस्रायल धोरणात्मक भागीदारी पुढच्या स्तरावर नेण्यासंदर्भात दोन्ही देशाचे परराष्ट्रमंत्री काम करतील असेही यावेळी ठरवण्यात आले.
पुढील वर्ष हे भारत आणि इस्रायल यांच्या धोरणात्मक संबंधांचे तिसावे वर्धापन वर्ष आहे, याची आठवण करत पंतप्रधानांनी बेनेट यांना भारताला भेट देण्याचे आमंत्रण दिले.
पंतप्रधानांनी बेनेट तसेच इजरायलच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या व आगामी रोश हशाना या ज्युईश सणाच्या शुभेच्छा दिल्या.


