Transportation is the key to development for any city and any country. India is one of the world's countries where urbanization is taking place at a fast pace: Prime Minister Modi
PM Modi reiterates the government’s vision of ‘Housing for All’ by 2022 when India celebrates its 75th year of independence
After 2014 we decided that the speed of laying the metro line would also increase and scale would also increase: Prime Minister
Our government is continuously making efforts to enhance lives of middle class people: Prime Minister Modi
The central government is moving forward on the path of development. No corner of the country, no village or city should be untouched by development: PM Modi
Through our initiatives, we are strengthening the hands of the poor, bringing a qualitative change in their lives: Prime Minister
In the last 4 years, several new projects have been initiated for laying the Metro network in Mumbai: Prime Minister Modi

मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

मुंबई आणि ठाणे हा देशाचा तो भाग आहे ज्याने देशाची स्वप्ने साकार करण्यात मदत केली. छोटी छोटी गावे आणि खेड्यांमधून आलेल्या सामान्य लोकांनी इथे मोठे नाव कमावले आहे, गौरव वाढवला आहे. इथे जन्मलेल्या, इथे राहणाऱ्या लोकांचे हृदय इतके विशाल आहे की सर्वांना त्यांनी आपल्या हृदयात सामावून घेतले आहे. म्हणूनच तर इथे संपूर्ण भारताची छबी एकाच ठिकाणी आढळते. जे कुणी इथे येतात ते मुंबईच्या रंगात रंगून जातात, मराठी परंपरेचा भाग बनून जातात.

बंधू आणि भगिनींनो, आज मुंबईचा विस्तार होत आहे, चोहोबाजूंनी विकास होत आहे. मात्र त्याचबरोबर इथे साधनसंपत्तीवर देखील दबाव वाढत आहे. विशेषतः येथील वाहतूक व्यवस्था, रस्ते आणि रेल्वे व्यवस्थेवर याचा प्रभाव दिसून येतो. हे सगळे ध्यानात घेऊन गेल्या चार-साडेचार वर्षात मुंबई आणि ठाण्यासह याला लागून असलेल्या अनेक भागांमध्ये वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत.

आज देखील इथे 33 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली आहे, यामध्ये दोन मेट्रो मार्गांचा देखील समावेश आहे. याशिवाय ठाण्यात 90 हजार गरीब आणि मध्यम वर्गातील कुटुंबांसाठी घरे बांधण्याच्या प्रकल्पाचाही शुभारंभ करण्यात आला आहे.

मित्रांनो, वाहतूक हा कोणत्याही शहराचा, देशाच्या विकासाचा महत्वपूर्ण हिस्सा असतो. भारत तर जगातील अशा देशांपैकी एक आहे जिथे जलद गतीने शहरीकरण होत आहे.

अलिकडेच एका संशोधनात आढळून आले आहे की आगामी दशकात अव्वल दहा सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्ये सर्व दहाच्या दहा शहरे ही भारतातील आहेत. म्हणजेच देश ज्या वेगाने विकासाची गती पकडत आहे, त्याचा एक मजबूत भाग हा आपल्या शहरांमध्ये राहणारे लोक आहेत.

मुंबई हे देशाच्या आर्थिक घडामोंडीचे केंद्र तर आहेच आणि आगामी काळात याचा आणखी विस्तार होणार आहे. म्हणूनच केंद्रात भारतीय जनता पार्टी आणि रालोआचे सरकार आले, तेव्हा आम्ही इथल्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले.

मुंबई लोकल रेल्वेसाठी शेकडो कोटी रुपयांची तरतूद केली. इथल्या जुन्या रेल्वे पुलांचे नूतनीकरण करण्यात आले. मुंबई लोकल व्यतिरिक्त वाहतुकीच्या अन्य माध्यमांचाही विस्तार करण्यात आला, ज्यामध्ये मेट्रो रेल्वे सर्वात प्रभावी माध्यम बनत चालले आहे.

आज ठाण्यात जो मेट्रोचा विस्तार झाला आहे, तो मुंबई, ठाणे आणि आसपासच्या अन्य क्षेत्रांना उत्तम संपर्क व्यवस्था पुरवण्याच्या दूरदृष्टीचाच एक भाग आहे.

मित्रांनो, मुंबईत सर्वप्रथम 2006 साली मेट्रोच्या पहिल्या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. मात्र आठ वर्षात काय झाले, प्रकल्प कुठे अडकला सांगणे कठीण आहे.

पहिला मार्ग 2014 मध्ये सुरु होऊ शकला आणि  तो देखील केवळ 11 किलोमीटरचा मार्ग. आठ वर्षात फक्त आणि फक्त 11 किलोमीटर.

2014 नंतर आम्ही ठरवले की मेट्रो मार्ग टाकण्याचा वेगही वाढेल आणि व्याप्तीही वाढेल. गेल्या चार वर्षात मुंबईत मेट्रोचे जाळे पसरवण्यासाठी अनेक नवीन प्रकल्प सुरु करण्यात आले.

याच विचाराने आज आणखी दोन मेट्रो मार्गांची पायाभरणी केली जात आहे. म्हणजेच पुढील तीन वर्षात इथे 35 किलोमीटरची मेट्रो क्षमता आणखी जोडली जाईल.

एवढेच नाही, 2022 ते 2024 दरम्यान मुंबईकरांना पावणेतीनशे किलोमीटरचा मेट्रो मार्ग उपलब्ध होईल.

आज जी पायाभरणी करण्यात आली त्यामध्ये ठाणे ते भिवंडी, कल्याण, दहिसर ते मीरा-भाईंदर पर्यंतच्या लोकांना तर फायदा होईलच, शिवाय यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या देखील कमी होईल.

मित्रांनो, या सुविधा केवळ आजच्या गरजांनुसार नव्हे तर 2035 सालातील गरजा लक्षात घेऊन विकसित केल्या जात आहेत.

बंधू आणि भगिनींनो, तुमचा प्रवास सुलभ होवो, तुमचे जीवन सुखकर व्हावे, देशातील गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांना घराशिवाय राहावे लागू नये यासाठी देखील व्यापक प्रयत्न केले जात आहेत.

केंद्र सरकारने ठरवले आहे की, 2022 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असेल, तेव्हा देशातील प्रत्येक कुटुंबाकडे स्वतःचे पक्के छत असेल, स्वतःचे पक्के घर असेल, हेच उद्दिष्ट पुढे नेत आज इथे 90 हजार नवी घरे बांधायला सुरुवात झाली आहे. मला सांगण्यात आले आहे की तीन वर्षांच्या आत ही घरे बांधून तयार होतील.

मित्रांनो, पूर्वीच्या सरकारपेक्षा आमचे संस्कार वेगळे आहेत, पद्धती वेगळ्या आहेत आणि वेग देखील वेगळा आहे. यापूर्वीच्या सरकारने आपल्या शेवटच्या चार वर्षात केवळ साडे पंचवीस लाख घरे बांधली होती, मात्र आमच्या सरकारने गेल्या चार वर्षात सुमारे 1 कोटी 25 लाखांहून अधिक म्हणजे पाच पटीपेक्षा अधिक लोकांसाठी घरे बांधली आहेत. याचा अर्थ त्यांना जर एवढे काम करायचे असते तर बहुधा दोन पिढ्या गेल्या असत्या.

 

प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात आठ लाख घरे बांधली जात आहेत. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेघर लोकांसाठी चांगल्या सोसायटी बांधल्या जात आहेत. आणि या त्या आदर्श सोसायटी नाहीत, ज्या यापूर्वीच्या सरकारच्या काळात चर्चेत होत्या. तर खऱ्या अर्थाने आदर्श सोसायटी बांधली जात आहे जिथे एक सामान्य कुटुंब स्वप्ने पाहू शकते, चांगल्या भविष्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आमचे सरकार अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत थेट बँकेत जमा करत आहे. म्हणजेच कर्जाची रक्कम थेट अडीच लाख रुपयांनी कमी होते. म्हणजे अल्प आणि मध्यम उत्पन्न वर्गातील लोकांची मदत गृहकर्जातही केली जात आहे.

याशिवाय आधीच्या तुलनेत गृह कर्जावरील व्याजदर देखील मोठया प्रमाणात कमी झाले आहेत. या योजनेअंतर्गत दुर्बल घटकातील लोकांना, अल्प उत्पन्न गटातील लोकांना व्याजदरात साडे सहा टक्क्यांची सवलत देखील दिली जात आहे.

 मध्यम उत्पन्न गटातील लोकांना व्याज दरात 3 ते 4 टक्क्यांची सवलत दिली जात आहे. याचाच अर्थ असा की, जर कोणी 20 लाख रुपयांचे गृह कर्ज 20 वर्षांसाठी घेतले असेल, तर त्या व्यक्तीला या कालावधीत अंदाजे 6 लाख रुपयांपर्यंतची मदत सरकार द्वारे दिली जाईल.

 मित्रांनो, सरकारच्या याच प्रामाणिक प्रयत्नांमुळे मागील एक-दीड वर्षात लाखो लोकांनी या योजनेचा लाभ घेत आपल्या पहिल्या घराची नोंदणी केली आहे, खरेदी केले आहे.

 एका अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत मागील 7-8 महिन्यात नवीन घरांची खरेदी दुपटीने अधिक वेगाने केली जात आहे.

 मला असे सांगण्यात आले आहे की, आज जी योजना सुरू होत आहे, त्यात देखील अशाप्रकारच्या लोकांना मदत केली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत महाराष्ट्रातील 85 हजारांहून अधिक लोकांना दोन हजार कोटी रुपयांची मदत मिळाली आहे.

मित्रांनो, आम्ही फक्त मध्यम वर्गांचे घराचे स्वप्न साकार करायला मदत करत आहोत असे नाही तर, याच्याशी निगडीत दुसऱ्या समस्या देखील सोडवत आहोत.

चार वर्षांपूर्वी पर्यंत, आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून नोंदणी केलेले घर ताब्यात घेण्यासाठी किती प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते याची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे.

काही लोकांच्या मुजोरी आणि चुकीच्या हेतूमुळे कशाप्रकारे वर्षानुवर्षे  तुम्हाला तुमच्या घराचा ताबा मिळत नव्हता. बोलणी काहीतरी वेगळ्याच गोष्टीची व्हायची आणि तुम्हाला दुसऱ्याच गोष्टीचा ताबा दिला जायचा असेही बऱ्याचदा घडायचे. या प्रवृत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला आहे.

आज स्थावर मालमत्ता नियामक प्राधिकरण म्हणजेच रेरा, देशातील बहुतेक राज्यांमध्ये अधिसूचित केले आहे. 21 राज्यांमध्ये तर न्यायाधिकरण देखील काम करत आहे.

मी फडणवीसजींचे अभिनंदन करतो, कारण, महाराष्ट्र देशातील त्या राज्यांपैकी एक आहे जिथे सर्वात आधी रेरा लागू करण्यात आला. देशभरातील अंदाजे, 35 हजार स्थावर मालमत्ता प्रकल्प आणि 27 हजार स्थावर मालमत्ता एजंटची यात नोंदणी झाली आहे. यात देखील महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रकल्पांचा समावेश आहे.

मित्रांनो, विचार करा, 70 वर्षांपासून कोणत्याही कठोर आणि स्पष्ट कायद्याशिवाय स्थावर मालमत्ता क्षेत्राचा कारभार सुरु होता. जर याआधीच सरकारने याप्रकारचा कायदा बनवला असत तर घर खरेदीदारांना न्यायालयाच्या खेपा घालाव्या लागल्या नसत्या आणि स्थावर मालमत्ता क्षेत्राचा विकास देखील प्रामाणिकपणे झाला असता.

बंधू आणि भगिनींनो, निम्न आणि मध्यम वर्गाचे विजेचे बिल कशाप्रकारे कमी करता येईल, याबाबत देखील सरकार निरंतर प्रयत्न करत आहे. देशभरात उजाला योजनेंतर्गत 30 कोटींहून अधिक एलईडी बल्बचे वाटप करण्यात आले आहे. पहिले जे काम 60 व्होल्ट चा बल्ब करायचा आज तेच काम ७ किंवा 8 व्होल्टचा बल्ब करत आहे. याचाच अर्थ विजेची बचत तर होतच आहे, त्याच बरोबर बिल देखील कमी येत आहे.

केवळ याच योजनेमुळे, दरवर्षी देशाच्या सर्व कुटुंबांची एकत्रितपणे अंदाजे 16 हजार कोटी रुपयांची बचत होत आहे. केवळ एकट्या महाराष्ट्रात लोकांचे दरवर्षीचे अंदाजे 1100 कोटी रुपयांचे विजेचे बिल कमी झाले आहे. 

एलईडी बल्बवर आम्ही युद्ध पातळीवर काम केल्याने आज हे शक्य झाले आहे. कंपन्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्पर्धेला प्रोत्साहन दिले, दलालांना हटवले. यामुळेच चार वर्षांपूर्वी जो बल्ब 250-300 रुपयांना मिळत होता, तोच आज 50 रुपयांपर्यंत मिळत आहे.

मित्रांनो, केंद्र सरकार ‘सबका साथ सबका विकास’ मार्गावर चालत आहे. देशातील कोणताही कोपरा, कोणतेही गाव आणि शहर, कोणताही वर्ग विकासापासून वंचित राहू नये यासाठी काम सुरु आहे. गरिबांच्या जीवन शैलीत सुधारणा व्हावी यासाठी योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी केली जात आहे.

उज्वला योजनेंतर्गत देशभरातील गरीब बहिणींचे आयुष्य धूर मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्या वेळेची बचत करण्यासाठी मोफत गॅस जोडणी दिली जात आहे.   

 आतापर्यंत देशभरात अंदाजे 6 कोटी जोडणी देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये ठाण्यासहित संपूर्ण महाराष्ट्रातील 34 लाखांहून अधिक भगिनींना मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे.

 मित्रांनो, अशा बहिणी ज्या छोटा-मोठा उद्योग करू इच्छितात- जसे की, पार्लर, टेलरिंग, विणकाम, हातमागावरील काम, असे कोणतेही काम करायचे असेल तर त्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे खुले आहेत.

मुद्रा योजनेंतर्गत कोणत्याही हमी शिवाय 50 हजार ते 10 लाख रुपयांचे कर्ज दिले जात आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारचे अंदाजे सव्वा कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे, ज्यातील एक कोटी रुपयांचे कर्ज महिलांच्या नावाने वितरीत करण्यात आले आहे.

बंधू आणि भगिनींनो, गरिबांना सन्मानाने आयुष्य जगता यावे, महिलांना आदर आणि सन्मान मिळावा; हेच आमचे ध्येय आहे आणि आम्ही ते साध्य देखील करत आहोत.

मुलांना शिक्षण, युवकांना रोजगार, वृद्धांना औषधोपचार, शेतकऱ्यांना सिंचन, नागरिकांना न्याय; विकासाच्या ह्या पंचसुत्राप्रती सरकार समर्पित आहे.

आणि शेवटी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विकासाच्या नवीन प्रकल्पांसाठी खूप खूप अभिनंदन. इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुम्ही आशीर्वाद दिलेत यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे.

मला इथून पुण्याला जायचे आहे. तिथे देखील हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करायचे आहे. तुम्ही मोठ्या संख्येने येऊन जे शक्तीप्रदर्शन केले आहे त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

खूप खूप धन्यवाद!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's high-flying ambitions: How policy overhaul doubled nation's MRO footprint from 96 to 166

Media Coverage

India's high-flying ambitions: How policy overhaul doubled nation's MRO footprint from 96 to 166
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address during participation in a community programme in The Hague, Netherlands
May 16, 2026

भारत माता की जय !!!!

इतना प्यार। इतना उत्साह। सच कहूँ, कुछ देर के लिए मैं भूल ही गया था कि मैं नेदरलैंड्स में हूँ। ऐसे लग रहा है जैसे भारत में ही कहीं कोई festival चल रहा है!

वैसे तो The Hague को दुनिया "City of Peace and Justice” के रूप में जानती है। लेकिन आज यहाँ जो माहौल है उसे देखकर लग रहा है कि The Hague, Living Symbol of Indian Friendship बन गया है!

ये दिखाता है कि पासपोर्ट का रंग बदल सकता है, Address भी बदल सकता है, Time Zone भी बदल सकता है लेकिन मां भारती की संतानें कहीं भी रहें ये गर्मजोशी, ये वाइब्रेंसी लाइफ को सेलिब्रेट करने का जज्बा ये हमेशा हमारे साथ रहता है। मैं आप सभी का, इस वॉर्म वेलकम के लिए बहुत-बहुत आभार व्यक्त करता हूं। और जब मैं यहाँ प्रवेश कर रहा था तो पूरा महाराष्ट्र, और छत्रपति शिवाजी महाराज, और मेरो प्यारों राजस्थान, और ए फॉर असम ...

साथियों,

आप सभी से मुलाकात के बाद आज मुझे His Majesty The King और Her Majesty The Queen से मिलने का अवसर मिलेगा। इसके साथ ही प्रधानमंत्री रॉब येत्तेन से भी विस्तार से कहीं विषयों पर चर्चा होगी।

बीते वर्षों में जब भी मेरी नेदरलैंड्स के leaders से बात हुई है वे हमेशा भारतीय डायस्पोरा की बहुत प्रशंसा करते आए हैं। मतलब की आप सब की प्रशंसा करते हैं। आप नेदरलैंड्स के समाज और यहां की इकॉनॉमी में जो कंट्रीब्यूट कर रहे हैं उस पर हर भारतवासी को गर्व है।

मैं आज इस अवसर पर नेदरलैंड्स की जनता का यहां की सरकार का आभार व्यक्त करता हूं। मैं यहां की जनता को 140 करोड़ भारतवासियों की तरफ से अपनी शुभकामनाएं देता हूं।

साथियों,

मैं पहले भी नेदरलैंड्स आता रहा हूँ। मेरे पुराने साथी यहाँ बैठें हैं। और यहां रहने वाले भारतीय समुदाय से भी काफी परिचय रहा है। यहाँ बैठे अनेक परिवारों की कहानी, केवल Migration की कहानी नहीं है। यह एक संस्कृति की आस्था की तमाम संघर्षों के बीच प्रगति की कहानी है।

उस दौर में तब किसी ने सोचा भी नहीं था कि दो महासागर पार करने के बाद भी भारतीयों की पहचान इतनी जीवंत रहेगी। आपके पूर्वज बहुत कुछ पीछे छोड़कर आए थे लेकिन कुछ चीजें हमेशा उनके साथ रहीं अपनी मिट्टी की खुशबू, अपने त्योहारों की स्मृतियाँ, भजन की धुनें, और अपने पूर्वजों के संस्कार।

साथियों,

मानवता का इतिहास साक्षी है कि समय के साथ अनेक संस्कृतियां मिट गईं। लेकिन भारत का डायवर्स कल्चर, आज भी अपने लोगों के दिलों में धड़कता है। पीढ़ियाँ बदल गईं देश बदल गए परिवेश बदल गए लेकिन परिवार के संस्कार नहीं बदले। अपनापन नहीं बदला। आपने डच भाषा को अपनाया लेकिन अपने पुरखों की भाषा को भी छोड़ा नहीं।

हमारे कम्यूनिटी रेडियो स्टेशन्स यहां बहुत पॉपुलर है। और इन स्टेशन्स के माध्यम से भारत का संगीत और संस्कृति भी डच फैमिलीज तक पहुंच रहे हैं। द गांधी सेंटर हो या फिर अलग-अलग शहरों के स्कूल आप अपनी संस्कृति को भावी पीढ़ियों तक पहुंचा रहे हैं। ये बहुत सराहनीय है। आप सब अभिनन्दन के अधिकारी हैं।

साथियों,

आज 16 मई है और ये दिन एक और वजह से बहुत विशेष है। आज से 12 वर्ष पहले 16 मई 2014 में कुछ खास हुआ था। 2014 में आज के ही दिन लोकसभा चुनाव के नतीजे आए थे। दशकों बाद भारत में स्थिर और पूर्ण बहुमत वाली सरकार का बनना पक्का हुआ था। एक वो दिन था और एक आज का दिन है कोटि-कोटि भारतवासियों का विश्वास मुझे न रुकने देता है और न थकने देता है। ये नॉन स्टॉप चले ही जा रहा है।

साथियों,

बहुत छोटी आयु से ही मैं देशभक्ति के रंग में रंग गया। आप ही मेरा परिवार बन गया। स्वर्ग सच समष्टि की और चल पड़ा। अहम् से वयं का रास्ता चुन लिया।

और फिर तो आप का सुख ही मेरा सुख बन गया। आपका कल्याण ही मेरा कर्तव्य बन गया। और समर्पित भाव से आप सब की आशीर्वाद से कुछ न कुछ करता रहा। लेकिन जनता जनार्दन का इतना प्यार मिलेगा...ये तो कल्पना में भी नहीं था।

जब पीछे मुड़के देखता हूँ तो 13 वर्ष मुख्यमंत्री के रूप में, 12 वर्ष प्रधानमंत्री का सेवाकाल, डेमोक्रेटिक वर्ल्ड में 25 वर्षों तक करोड़ों-करोड़ वोटर्स का लगातार समर्थन ये मेरे लिए बहुत ही बड़े सौभाग्य की बात है।

मेरे लिए ये सिर्फ एक आंकड़ा नहीं है ये आपका आशीर्वाद ये मेरी बहुत बड़ी पूंजी है। देश का ये प्यार, ये आशीर्वाद मुझे अपने जीवन का पल-पल देशवासियों के सपनों को पूरा करने के लिए प्रेरित करता है।

साथियों,

दुनिया का कोई भी देश हो अगर उसे आगे बढ़ना है तो उसे बड़े सपने देखने ही होंगे। आज हमारा भारत भी बहुत बड़े सपने देख रहा है। आज देश कह रहा है - हमें सिर्फ ट्रांसफॉर्मेशन नहीं चाहिए हमें best चाहिए। और हमें बेस्ट ही नहीं हमें fastest चाहिए। और इसलिए जब भारत में Aspirations Unlimited हैं, तो Efforts भी Limitless हो रहे हैं।

जैसे भारत के युवाओं का उदाहरण है। आज भारत का युवा आसमान छूना चाहता है। वो startup शुरू करना चाहता है, वो quality products बनाना चाहता है, वो drone मैन्यूफैक्चर करना चाहता है, वो AI और semiconductor की दुनिया में भारत को आगे ले जाना चाहता है।

इसीलिए ही भारत का Startup ecosystem लगातार मजबूत हो रहा है अब हम दुनिया के तीसरे सबसे बड़े स्टार्ट अप इकोसिस्टम वाले देश हैं।

और साथियों,

आज भारत की aspiration सिर्फ अपनी सीमाओं तक नहीं है। भारत चाहता है वो Olympics host करे, global manufacturing hub बने,green energy leader बने, और दुनिया का growth engine बने।

बात वही है, Aspirations Unlimited हैं, और हमारे efforts की स्केल भी उतनी ही बड़ी है। record highways कंस्ट्रक्शन, record rail electrification, वंदे भारत जैसी सेमी-हाइस्पीड ट्रेनें, और दुनिया का इतना बड़ा renewable expansion, बड़े से बड़ा लक्ष्य हो, आज का भारत कहता है हम ये लक्ष्य पाकर ही रहेंगे। और हम ये करके दिखा रहे हैं।

साथियों,

आज का भारत, एक अभूतपूर्व परिवर्तन के दौर से गुज़र रहा है। आपने हाल में देखा होगा कि दुनिया की सबसे बड़ी और सफल AI समिट भारत ने आयोजित की। उससे पहले G-20 की सफल समिट भी भारत ने आयोजित की थी। ये कोई वन टाइम इवेंट नहीं था ये आज के भारत का मिज़ाज बन गया है।

दुनिया का सबसे बड़ा यूनीक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया। दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया। जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है, वो अभूतपूर्व है। दुनिया की सबसे बड़ी govt funded हेल्थ इंश्योरेंस स्कीम् भारत चला रहा है।

और हां, चांद पर भी भारत वहां पहुंचा, जहां पहले कोई नहीं पहुंच पाया था। और नूक्लीयर एनर्जी में दुनिया के सबसे एडवांस्ड फास्ट ब्रीडर रिएक्टर पर भी आज सफलता के साथ भारत काम कर रहा है।

साथियों,

भारत की जो ये स्केल है, ये हम इंफ्रास्ट्रक्चर निर्माण में भी देख रहे हैं। आज भारत में जो सोलर पार्क बन रहे हैं वो विश्व के सबसे बड़े पार्क्स में से एक हैं।

सबसे ऊंची और लंबी टनल्स हों, सबसे ऊंचे और लंबे bridges हों, सबसे लंबे एक्सप्रेसवे हों, सबसे बड़े मेट्रो नेटवर्क हो, सबसे बड़े सिविल एविएशन नेटवर्क हों, सबसे बड़े इलेक्ट्रिफाइड रेल नेटवर्क हों, इनमें से अनेक आज भारत में बन रहे हैं।

बीते सालों में भारत ने धरती से चंद्रमा की दूरी जितनी है, उससे भी 11 गुणा अधिक ऑप्टिकल फाइबर बिछाया है। एक दशक पहले हम मोबाइल फोन इंपोर्ट करते थे आज भारत, दूसरा सबसे बड़ा मोबाइल फोन मैन्युफेक्चरर है।

साथियों,

ये जो स्पीड और स्केल है इसके अलावा आज के भारत की एक और पहचान है। आज का भारत Innovation powered है। हमारे डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर की चर्चा आज पूरी दुनिया में होती है। ये भारतीयों के इनोवेशन का बहुत बड़ा प्रमाण है।

आज पैसा रखना हो- तो डिजिटल वॉलेट है, डॉक्यूमेंट्स रखने हों- तो डिजी लॉकर है। ट्रैवल करना हो- तो डिजी यात्रा है। हेल्थकेयर का लाभ लेना हो- तो डिजिटल हेल्थ आईडी है।

साथियों,

आज भारत में हर महीने twenty Billion से ज्यादा UPI ट्रांजेक्शन होते हैं। यानि, पूरी दुनिया में हो रहे डिजिटल ट्रांजेक्शन में, आधे से ज्यादा, केवल भारत में हो रहें हैं।

और स्टार्ट अप तो, आज भारत के युवाओं का मिज़ाज बन चुका है। बारह साल पहले देश में 500 से भी कम स्टार्ट-अप्स थे, आज ये संख्या बढ़कर 2 लाख से ज्यादा हो गई है। और स्टार्टअप के दुनिया में भी, 2014 में भारत में सिर्फ चार यूनिकॉर्न थे। आज भारत में करीब सवा सौ एक्टिव यूनिकॉर्न हैं। 2025 में ही, करीब 44 हजार और नए startups रजिस्टर हुए हैं। आज AI, डिफेंस और स्पेस सेक्टर में हमारे स्टार्ट अप्स बहुत ही शानदार काम कर रहे हैं।

समय के साथ, रिसर्च और इनोवेशन का ये कल्चर और विराट होता जा रहा है। पिछले वर्ष ही भारत में सवा लाख से अधिक पेटेंट्स फाइल किए गए हैं।

साथियों,

भारत चिप मेकिंग में, सेमीकंडक्टर सेक्टर में भी बड़े कदम उठा रहा है। अभी भारत में 12 सेमीकंडक्टर प्लांट्स पर काम चल रहा है। इनमें से दो प्लांट्स में प्रोडक्शन भी शुरु हो चुका है। यानि अब चिप भी, डिजाडन्ड इन इंडिया, मेड इन इंडिया होगी।

साथियों,

भारत की ये aspiration driven जर्नी, हमारी डेमोक्रेसी को भी सशक्त कर रही है। जब लोगों के सपने सच होते हैं तो लोकतंत्र पर उनका भरोसा भी मजबूत होता है।

साथियों,

मैं आपको हाल के विधानसभा चुनावों का उदाहरण देता हूं। असम, बंगाल, केरलम्, तमिलनाडु और पुडुचेरी में इस बार Eighty से Ninety Percent तक वोटिंग हुई। इसमें भी वीमेन पार्टिसिपेशन बहुत ज्यादा बढ़ी है। ये हर राज्य का ट्रेंड है।

आज भारत में वोटर उत्साहित हैं, आप भी उत्साहित हैं। साथियों, हमें गर्व होता है की हर साल वोटिंग के रिकॉर्ड टूट रहे हैं।

साथियों,

भारत में 90 करोड़ से अधिक वोटर रजिस्टर्ड हैं। 2024 के लोकसभा चुनाव में sixty four करोड़ लोगों ने वोट डाला। यानि यूरोपियन यूनियन की टोटल पॉपुलेशन से भी ज्यादा भारतीयों ने वोटिंग की। भारत अपने हर सिटिजन की डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन को वैल्यू करता है। और मदर ऑफ डेमोक्रेसी के रूप में, ये हम सभी के लिए बहुत गर्व की बात है।

साथियों,

भारत जब सफल होता है तो पूरी मानवता को उसका फायदा होता है। लेकिन आज मानवता के सामने अनेक बड़ी चुनौतियां भी हैं। आज की दुनिया, किस तरह नई-नई चुनौतियों से जूझ रही है।

पहले कोरोना आया फिर युद्ध होने शुरू हुए और अब आज की एनर्जी क्राइसिस है। ये दशक, दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है।

हम सभी देख रहे हैं। अगर, ये स्थितियां तेजी से नहीं बदली गईं तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी।

साथियों,

ऐसी वैश्विक परिस्थितियों में आज दुनिया resilient supply chain की बात कर रही है। और तब भारत और नेदरलैंड्स मिलकर, एक trusted, transparent और future-ready supply chain बनाने में जुटे हैं।

एनर्जी सिक्योरिटी से लेकर वॉटर सिक्योरिटी तक नेदरलैंड्स और भारत, मिलकर काम कर रहे हैं। ग्रीन हाईड्रोजन को लेकर हमारा को-ऑपरेशन बहुत महत्वपूर्ण है। और भारत और यूरोपीय यूनियन के बीच जो ऐतिहासिक ट्रेड एग्रीमेंट हुआ है इससे भारत और नेदरलैंड्स की साझेदारी और मजबूत होगी।

और इसका लाभ आप सभी को होगा। भारतीय businesses के लिए Europe में प्रवेश का natural gateway Netherlands बनेगा। और इस journey में हमारा diaspora trusted bridge बन सकता है। और में इसलिए कहता हूँ की diaspora India की ambition को भी समझता है और Europe के standards को भी जानता हैं। इससे यहां बसे भारतीयों को भी भारत के high-quality products के अधिक अवसर मिलेंगे।

साथियों,

नेदरलैंड्स ट्यूलिप की धरती है, और यहां के खूबसूरत ट्यूलिप्स को देखने के लिए दुनिया भर के लोग यहां आते हैं। भारत में भी, दुनिया के सबसे बड़े ट्यूलिप गार्डन्स में से एक हमारे जम्मू-कश्मीर में है, श्रीनगर में है।

और जिस तरह नेदरलैंड्स को ट्यूलिप्स के लिए जाना जाता है, वैसे ही भारत, लोटस यानि कमल के लिए जाना जाता है।

साथियों,

ट्यूलिप और कमल दोनों फूल हमें बताते हैं कि जड़ें चाहे पानी में हों या धरती पर अगर सही पोषण मिले तो सुंदरता भी मिलती है और स्ट्रेंथ भी आ जाती है। यही भारत और नेदरलैंड्स के बीच Partnership का भी आधार है।

साथियों,

हमारे बीच दोस्ती की एक और कड़ी है जिसकी उतनी चर्चा नहीं होती और वो है स्पोर्ट्स। हम दोनों देश, स्पोर्ट्स के क्षेत्र में बहुत कुछ मिलकर कर रहे हैं।

अब जैसे क्रिकेट है । नेदरलैंड्स की क्रिकेट में भारतीय समुदाय का बहुत बड़ा योगदान है। अभी भारत में टी-20 वर्ल्ड कप हुआ उसमें नेदरलैंड्स की टीम ने अच्छा प्रदर्शन किया। भारत वर्ल्ड कप चैंपियन है लेकिन भारत की टीम को भी, नेदरलैंड्स की टीम ने बहुत कड़ी टक्कर दी थी।

जब हम तेजा निदामनुरु और विक्रमजीत सिंह को नेदरलैंड्स की जर्सी में देखते हैं, या फिर, जब आर्यन दत्त जैसे युवा खिलाड़ी, डच क्रिकेट के फ्यूचर में कंट्रीब्यूट करते हैं तो हम सभी को बहुत अच्छा लगता है।

साथियों,

जैसे क्रिकेट में भारतीयों का योगदान है वैसे ही भारत की हॉकी में नेदरलैंड्स का भी बड़ा कंट्रीब्यूशन है। भारत की हॉकी को और अधिक निखारने में डच coaches की भी मेहनत रही है। हमारी वीमेन हॉकी टीम, बीते कुछ समय से शानदार परफॉर्मेंस कर रही है। इसमें, कोच मरीन का अहम रोल है।

और इस वर्ष तो हॉकी वर्ल्ड कप का होस्ट, नेदरलैंड्स भी है। और आप सभी को भारत के मैच देखने तो जाना ही जाना है। ये बात पक्की है, कि वर्ल्ड कप जो भी जीते, इतना पक्का है कि भारत और नेदरलैंड्स की दोस्ती ज़रूर जीतेगी।

साथियों,

भारत और नेदरलैंड्स के बीच के रिश्ते की असली ताकत आप सभी हैं। आप, इस पार्टनरशिप के जीवंत सेतु हैं, जीवंत भी हैं। इसलिए, भारत सरकार ने सूरीनामी हिंदुस्तानी समाज के लिए, OCI Card की Eligibility चौथी पीढ़ी से बढ़ाकर छठी पीढ़ी तक कर दी है।

साथियों,

21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है। भारत technology-driven भी है और humanity-driven भी। भारत जितना ancient है उतना ही modern बन रहा है।

इसलिए ये समय भारत में आपके पुरखों के गांव से जुड़ने का भी है, और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है। मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट्स पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा और ये, मोदी की गारंटी है।

इतनी बड़े तादाद में आप सब आये। आप सब के दर्शन करने का सौभाग्य मिला। मुझे बहुत ख़ुशी हुवी। इसी भाव के साथ, मैं अपनी बात समाप्त करता हूं।

इतने गर्मजोशी भरे वेलकम के लिए, फिर से आप सबका बहुत बहुत धन्यवाद !

भारत माता की जय !