PM lays foundation stone for IARI in Assam, says agriculture needs to be developed in line with the requirements of the 21st century
Farmers must benefit from the changing technology: PM Modi
PM highlights "Panch Tatva" - five elements to boost connectivity in the North-East

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या गोगामुख येथे आयएआरआय अर्थात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे भूमीपूजन केले.

यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी आसाम सरकार आणि मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यात केलेल्या कार्याची प्रशंसा केली.

आयएआरआयच्या भूमीपूजनामध्ये या संपूर्ण भागाच्या भविष्यावर सकारात्मक परिणाम होण्याची क्षमता असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 21 व्या शतकाच्या आवश्यकतेनुसार कृषी क्षेत्राचा विकास होण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. बदलत्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे असेही ते म्हणाले.

या विभागाच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन आधुनिक शेती आणि तंत्रज्ञानाच्या गरजेवर त्यांनी भर दिला.  

स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन वर्षात 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.  

गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक पावलं उचलल्याचं पंतप्रधान म्हणाले. यासंदर्भात त्यांनी मृदा आरोग्य पत्रिका, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचाही उल्लेख केला. देशभरात मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत असलेल्या मृदा आरोग्य परीक्षण प्रयोगशाळा आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना, शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ईशान्येकडच्या प्रदेशात दळणवळण वाढवण्यासाठी रेल्वे, महामार्ग, हवाई मार्ग, जलमार्ग आणि आयवेज हे पाच पंचतत्व पंतप्रधानांनी विषद केली. 

या पंचतत्वाद्वारे ईशान्येकडच्या जनतेच्या कल्याणासाठी आपले सरकार कार्यरत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's telecom sector surges in 2025! 5G rollout reaches 85% of population; rural connectivity, digital adoption soar

Media Coverage

India's telecom sector surges in 2025! 5G rollout reaches 85% of population; rural connectivity, digital adoption soar
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 डिसेंबर 2025
December 20, 2025

Empowering Roots, Elevating Horizons: PM Modi's Leadership in Diplomacy, Economy, and Ecology