शेअर करा
 
Comments
PM Modi says the development strides in Kutch are truly commendable
The White Rann has become the cynosure of all eyes from across the world: PM Modi in Anjar
We want to strengthen the existing infrastructure and at the same time want to focus on futuristic development projects: PM Modi
We want to bring qualitative changes in the lives of the common citizen of India: PM Modi in Anjar
Today, we have made effort to make the aviation sector more affordable and improve connectivity, says PM Modi
We cannot alleviate poverty if we are energy poor. A strong energy sector is needed for the growth of any country: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये अंजार-मुंद्रा पाईपलाईन प्रकल्प, मुंद्रा एलएनजी टर्मिनल आणि पालनपूर-पाली-बाडमेर पाईपलाईन प्रकल्पाचे उद्‌घाटन केले.

यावेळी बोलताना कच्छच्या लोकांचा आपल्याप्रती असलेला स्नेह भारावून टाकणारा आहे असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या वीस वर्षात कच्छ भागात झालेल्या विकासकामांविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

एलएनजी टर्मिनलचे उद्‌घाटन हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण आहे असे सांगत आपल्याला तीन एलएनजी टर्मिनल्सचे उद्‌घाटन करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले.

गुजरातला पहिले एलएनजी टर्मिनल मिळाले होते तेंव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते मात्र आज गुजरातमध्ये लवकरच लवकरच चौथे एलएनजी टर्मिनल बनवण्याची क्षमता आहे असे मोदी यांनी नमूद केले.

गुजरात देशातले एलएनजीचे केंद्र बनले आहे असे सांगत याचा प्रत्येक गुजराथी माणसाला अभिमान वाटायला हवा असे ते म्हणाले. देशाच्या विकासासाठी ऊर्जा क्षेत्र मजबूत असणे आवश्यक असून उर्जा क्षमता नसेल तर गरीबी निर्मूलन होणार नाही असे मोदी म्हणाले.

देशातल्या जनतेच्या आशा-आकांक्षा वाढत आहेत त्यांना पारंपारिक पायाभूत सुविधांसोबतच आय-वे गॅस वाहिनीचे जाळे, जलवाहिनीचे जाळे, ऑप्टिकल फायबर नेटवर्क अशा आधुनिक सुविधाही हव्या आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्रात अनेक संधी असून जगभरातले पर्यटक भारतात येण्यास उत्सुक आहेत. कच्छमध्येही “श्वेत रण” हे संपूर्ण जगाचे आकर्षण केंद्र बनले आहे. नागरी हवाई वाहतूक विभागाने विमान वाहतूक स्वस्त करण्यासाठी आणि वाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.

देशभरातल्या सर्व गावांमध्ये वीज पोहोचवणे आणि प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवणे या दोन्ही गोष्टींसाठी केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी माहिती दिली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानाचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Explore More
जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद

लोकप्रिय भाषण

जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद
India exports Rs 27,575 cr worth of marine products in Apr-Sept: Centre

Media Coverage

India exports Rs 27,575 cr worth of marine products in Apr-Sept: Centre
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 डिसेंबर 2021
December 08, 2021
शेअर करा
 
Comments

The country exported 6.05 lakh tonnes of marine products worth Rs 27,575 crore in the first six months of the current financial year 2021-22

Citizens rejoice as India is moving forward towards the development path through Modi Govt’s thrust on Good Governance.