शेअर करा
 
Comments
PM Modi flags off new train service between Kolkata & Khulna via video conference
The rail network which has been constructed with almost $100 million will enhance connectivity in a big way between India & Bangladesh: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज संयुक्तपणे भारत आणि बांग्लादेश दरम्यानच्या कनेक्टिव्हीटी प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

यामध्ये भैरब आणि तितास रेल्वे पूल आणि कोलकात्त्यामध्ये चित्तपूर येथील आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रवासी टर्मिनल यांचा समावेश आहे. यावेळी मान्यवरांनी कोलकात्ता यांनी खुलाना दरम्यानच्या बंधन एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज देखील नवी दिल्ली येथून या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

याप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण खालीलप्रमाणे :-

“या कार्यक्रमात सहभागी झालेले आणि विशेषत: बांग्लादेशामध्ये राहणाऱ्या सर्व बंधू-भगिनींना नमस्कार.

काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये दिवाळी, दुर्गा पूजा आणि काली पूजेचा उत्सव साजरा करण्यात आला.

मी उभय देशांच्या नागरिकांना या सणांच्या शुभेच्छा देतो.

मला आनंद होत आहे की, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा भेटण्याची मला संधी मिळाली.

तुमच्या निरोगी आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा.

मला सुरुवातीपासूनच असे वाटते की, शेजारील देशांच्या नेत्यांसोबत आपले संबंध खऱ्या अर्थाने शेजाऱ्यांसारखे असले पाहिजे.

आपल्या मनाला जेव्हा वाटेल तेव्हा त्यांना भेटता आले पाहिजे, बोलता आले पाहिजे.

या सर्वांमध्ये कधीच कोणता शिष्टाचार नको.

नुकतेच आम्ही दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणावेळी याच प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्स केली होती.

गेल्यावर्षी आम्ही एकत्रितपणे याच प्रकारे पेट्रा-पोल आयसीपीचे उद्‌घाटन केले होते.

उभय देशांमधील कनेक्टीव्हीटी मजबूत करणाऱ्या महत्वपूर्ण प्रकल्पांचे उद्‌घाटन आज आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले आहे याचा मला आनंद होतो आहे.

कनेक्टिव्हीटीचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे लोकांचे लोकांशी जोडले जाणे.

आणि आज आंतरराष्ट्रीय प्रवासी टर्मिनलच्या उद्‌घाटनामुळे कोलकात्ता-ढाका मैत्री एक्सप्रेस आणि आज उद्‌घाटन झालेल्या कोलकात्ता खुलना बंधन एक्सप्रेसच्या प्रवाशांना अनेक सुविधा मिळतील.

यामुळे या प्रवाश्यांना कस्टम आणि इमिग्रेशनचा त्रास होणार नाही. तसेच त्यांच्या प्रवासाचा वेळ तीन तासांनी कमी होईल.

मैत्री आणि बंधन या दोन्ही रेल्वे सुविधांची नावे देखील आमच्या विचारांना अनुकूल आहेत.

जेव्हा कधी आम्ही कनेक्टिव्हीविषयी बोलतो तेव्हा आम्हाला नेहमीच तुमच्या 1965 पूर्वीच्या दृष्टिकोनाचा विचार येतो.

मला आनंद आहे की, आपण या दिशेने निरंतर पुढे जात आहोत.

आज आपण दोन रेल्वे पूलांचे उद्‌घाटन केले. अंदाजे 100 मिलियन डॉलर खर्च करुन उभारलेले हे पुल बांग्लादेशच्या रेल्वे प्रणालीला मजबूती प्रदान करतील.

बांग्लादेशच्या विकास कार्याल विश्वस्त म्हणून सहभागी होतांना भारताला खूप अभिमान वाटत आहे.

मला आनंद होत आहे की, आमच्या आठ बिलियन डॉलरच्या आर्थिक सवलतीच्या बांधिलकी अंतर्गंत हा प्रकल्प खूप चांगल्याप्रकारे प्रगती करत आहे.

विकास आणि कनेक्टिव्हीटी एकमेकांशी जोडले गेले आहेत. आणि आपल्या दोन्ही देशांदरम्यान शेकडो वर्षांपासूनचे ऐतिहासिक संबंध आहेत विशेषत: पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या लोकांदरम्यान त्यांना मजबूत करण्याच्या दिशेने आम्ही आज आणखी काही पावले पुढे आलो आहोत.

मला विश्वास आहे की, भविष्यात जसे जसे हे संबंध पुढे जातील आणि लोकांमधील नाती अजून मजबूत होतील, तसेतसे आपण विकास आणि समृध्दीच्या नवीन आभाळाला गवसणी घालू.

या कामात सहकार्य केल्याबद्दल मी प्रधानमंत्री शेख हसीना आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानतो.

धन्यवाद.

 

  

 

 

परीक्षा पे चर्चा 2022' साठी पंतप्रधानांचे सहभागी होण्याचे आवाहन
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Padma Awards Under Modi Govt: Honouring Different Leaders From Across The Spectrum

Media Coverage

Padma Awards Under Modi Govt: Honouring Different Leaders From Across The Spectrum
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...