PM Modi congratulates Commonwealth Games medal winners

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.भारत्तोलकांचे अभिनंदन करताना, सुवर्णपदक विजेत्या रगाला वेंकट राहुल याचा अभिमान आहे.आपल्या भारत्तोलकांच्या चमकदार कामगिरीमुळे, भारत्तोलन क्षेत्राकडे येण्यासाठी अधिकाधिक युवकांना प्रेरणा मिळेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

69 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या महिला भारत्तोलक, पूनम यादवचे अभिनंदन.भारत्तोलनाप्रती तिची निष्ठा वाखाणण्याजोगी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

नेमबाजांचे अभिनंदन, मनू भाकेरनं चमकदार कामगिरी सुरूच ठेवत, महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.तिचे अभिनंदन.

महिलांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात रजत पदक मिळवणाऱ्या हीना सिद्दूची कामगिरी प्रभावदार आहे, तिचे अभिनंदन करतानाच भविष्यातील कामगिरीसाठी, पंतप्रधानांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाज रवी कुमार याने कांस्य पदक पटकावले असून त्याच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.या युवा नेमबाजाने क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिल्याचे पंतप्रधान म्हणाले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Media Coverage

"Overwhelmed By The Warmth": PM Modi Receives Grand Welcome In Uzbekistan
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 29 ऑगस्ट 2026
August 29, 2026

New India, New Speed, New Stage: Missiles, Medals, Multilateralism under PM Modi