पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ कुंभ आणि स्वच्छ आभार कार्यक्रमाला प्रयागराज इथे संबोधित केले.

प्रयागराज इथल्या पवित्र संगमावर स्नान केल्यानंतर पंतप्रधानांनी स्वच्छ कुंभसाठी योगदान देणाऱ्या, स्वच्छता दूतांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांची चरणवंदना केली.

प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यासाठी जमलेल्या भाविकांसाठी सर्वात उत्तम सुविधा उपलब्ध करुन देणारे सर्व जण कर्मयोगी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक, नावाडी, स्थानिक आणि स्वच्छता कामगार यांचा उल्लेख केला. गेल्या काही आठवड्यात 21 कोटीहून अधिक लोकांनी कुंभमेळ्याला भेट दिल्याचे सांगून पंतप्रधानांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उल्लेख केला आणि काहीही अशक्य नाही, हे या कर्मचाऱ्यांनी दाखवून दिल्याचे स्पष्ट केले. ज्यावेळी आपण काही स्वच्छता कर्मचाऱ्यांची चरणवंदना केली तो क्षण कायम स्मरणात कोरला गेल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

आज जाहीर केलेल्या स्वच्छ सेवा सन्मान कोषामुळे स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना गरजेच्या काळात सहाय्य होईल, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छ भारत अभियान वेगाने प्रगती करत असल्याचे ते म्हणाले. यावर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीपूर्वी उघड्यावर शौच करण्यापासूनमुक्त होण्याच्या दिशेने देश वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले.

गंगा नदीची स्वच्छता हा यावर्षी अनेकदा चर्चेचा विषय झाल्याचे मोदी यांनी सांगितले. आज आपण याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे ते म्हणाले. नमामि गंगे अभियान आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. नदीत सोडले जाणारे सांडपाणी बंद करण्यात आले असून, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्याला 1 कोटी 30 लाख रुपये निधीचा समावेश असणारा सेऊल शांतता पुरस्कार मिळाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हा निधी नमामि गंगे मिशनला दान केल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणून मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला असून, यातून मिळालेले पैसेही नमामि गंगेसाठी दिल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभ मेळ्यात सहभागी झालेल्या नाविकांसाठीही पंतप्रधानांनी विशेष कौतुकोद्‌गार काढले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या यात्रेकरुंना अक्षय वटला भेट देणे शक्य झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

अध्यात्म, श्रद्धा आणि आधुनिकता यांचा संगम असणाऱ्या कुंभमेळ्याला साकार केल्याबद्दल पंतप्रधानांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले तसेच या संदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांनी बजावलेल्या कार्याचेही कौतुक केले.

यावर्षीच्या कुंभमेळ्यासाठी केलेल्या व्यवस्थेमध्ये विविध महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा समावेश होता. ज्याचा फायदा शहराला कुंभमेळा संपल्यावरही होईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's exports hit record USD 863 bn despite global turmoil; on track for USD 2 trillion target by 2030: Piyush Goyal

Media Coverage

India's exports hit record USD 863 bn despite global turmoil; on track for USD 2 trillion target by 2030: Piyush Goyal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मे 2026
May 15, 2026

Viksit Bharat Unleashed: PM Modi's Blueprint Delivers Energy Independence, Tech Boom, and Diplomatic Dominance