शेअर करा
 
Comments

भारतासमोरच्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी सोपे उपाय शोधावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 36 अवर सिंगापूर इंडिया हॅकेथॉनची आज आयआयटी चेन्नई इथे सांगता झाली. त्यावेळी पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. हे उपाय भारत संपूर्ण जगाला विशेषत: गरीब राष्ट्रांना देऊ इच्छितो, असे ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधानांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. इथे जमलेल्या प्रत्येक युवा मित्राचे विशेषत: विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन. आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यावर सहज साध्य उपाय शोधण्याची आपली इच्छा, चैतन्य आणि उत्साह, केवळ स्पर्धा जिंकण्यापेक्षा अधिक मोलाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

स्टार्ट अप स्नेही तीन परिसंस्थांपैकी भारत एक आहे. गेल्या पाच वर्षात भारताने नाविन्यता आणि कल्पकतेवर मोठा भर दिला आहे.

अटल नाविन्यता अभियान, पंतप्रधान रिसर्च फेलोशिप, स्टार्ट अप इंडिया अभियान यासारखे उपक्रम नाविन्यतेला प्रोत्साहन देणाऱ्या 21 व्या शतकातल्या भारताचा पाया आहेत, असे ते म्हणाले.

यंत्रविषयक शिक्षण, कृत्रिम बुद्धीमत्ता, ब्लॉकचेन यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाची आम्ही 6 व्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांना ओळख करुन देत आहोत. शाळा ते उच्च शिक्षणातल्या संशोधनापर्यंत, नाविन्यतेचे माध्यम ठरेल अशी रचना विकसित करण्यात येत आहे.

दोन कारणांसाठी आम्ही नाविन्यतेला प्रोत्साहन देत आहोत. एक म्हणजे देशातल्या जनतेचे जीवन सुलभ करण्यासाठी आम्हाला सोपे उपाय हवे आहेत आणि दुसरे म्हणजे संपूर्ण जगासाठीही भारताला हे उपाय हवे आहेत. जगाच्या उपयोगासाठी भारतीय उपाय हे आमचे उद्दिष्ट असून, त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. माफक दरातले हे उपाय गरीब देशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत उपलब्ध करुन देऊ इच्छितो. गरीब आणि वंचितांसाठी भारतीय नाविन्यपूर्ण आणि कल्पक उपाय आम्ही देऊ इच्छितो, असे ते म्हणाले.

हे दुसरे हॅकेथॉन, भारत सरकार, सिंगापूर सरकार, आयआयटी चेन्नई आणि सिंगापूर मधल्या एनटीयु म्हणजे नॉनयांग तंत्रविद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या संकल्पनेवर आधारीत पहिले हॅकेथॉन सिंगापूरमध्ये एनटीयु इथे आयोजित करण्यात आले होते.

आयआयटी-एमच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाला आणि पदवीदान समारंभालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read full text speech

सेवा आणि समर्पणाची व्याख्या सांगणारी 20 छायाचित्रे
Mann KI Baat Quiz
Explore More
जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद

लोकप्रिय भाषण

जम्मू काश्मीरच्या नौशेरा जिल्ह्यात भारतीय सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी सैनिकांसोबत साधलेला संवाद
India achieves 40% non-fossil capacity in November

Media Coverage

India achieves 40% non-fossil capacity in November
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 डिसेंबर 2021
December 04, 2021
शेअर करा
 
Comments

Nation cheers as we achieve the target of installing 40% non fossil capacity.

India expresses support towards the various initiatives of Modi Govt.