शेअर करा
 
Comments
Vijaya Dashami is the festival of victory of truth over falsehood; and of defeating the oppressor: PM Modi
Terrorism is the enemy of humanity: PM Modi
The forces of humanity across the world must now unite against terrorism: PM Modi
PM Modi urges people to defeat the Ravana existing in the form of corruption, illiteracy and poverty

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौ इथल्या ऐशबाग रामलीला मैदानात दसरा महोत्सवानिमित्त जाहीर सभेला संबोधित केले.

प्राचीन परंपरा लाभलेल्या या रामलीलेत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले, असे सांगतानाच पंतप्रधानांनी जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. रामलीला म्हणजे सत्याचा असत्यावरचा विजय होय आणि जुलूम करणाऱ्याचा पाडाव. दरवर्षी आपण रावणाच्या प्रतिमेचे दहन करतो. आपल्यातल्या समाजातल्या वाईट गोष्टी नष्ट करण्याचा निश्चय आपण केला पाहिजे. प्रत्येक दसऱ्याला आपल्यातल्या दहा उणिवा नष्ट करण्याचा निश्चय जनतेने करावा, असे आवाहन त्यांनी केले. वाईट गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवून आपले राष्ट्र महान व्हावे, यासाठी आपल्या प्रत्येकाकडे शक्ती आहे, यावर त्यांनी भर दिला.

दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मानवता, त्याग आणि निष्ठेचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीराम होत. रामायणामधल्या जरायूने दहशतवादाविरोधात सर्व प्रथम लढा दिला होता, निर्भयतेचा संदेश जरायूने आपल्याला दिला, दहशतवादाविरोधात 125 कोटी भारतीयांनी जरायू बनावे असा संदेश पंतप्रधानांनी दिला.

प्रत्येक जण जर दक्ष राहीला, तर दहशतवाद्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील, असे ते म्हणाले. दहशतवादाविरोधात जगातल्या मानवतावादी शक्तींनी एकवटायला हवे, दहशतवाद्यांना थारा देणाऱ्यांचीही गय करता कामा नये, असेही त्यांनी सांगितलं.

आज आंतरराष्ट्रीय बालिका दिनही साजरा केला जात आहे. स्त्री-भ्रूण हत्येसारख्या वाईट गोष्टीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपण सर्वांनी कसून प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

Click here to read full text speech

Modi Govt's #7YearsOfSeva
Explore More
चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी

लोकप्रिय भाषण

चलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी
'Little boy who helped his father at tea stall is addressing UNGA for 4th time'; Democracy can deliver, democracy has delivered: PM Modi

Media Coverage

'Little boy who helped his father at tea stall is addressing UNGA for 4th time'; Democracy can deliver, democracy has delivered: PM Modi
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 सप्टेंबर 2021
September 26, 2021
शेअर करा
 
Comments

PM Narendra Modi’s Mann Ki Baat strikes a chord with the nation

India is on the move under the leadership of Modi Govt.