शेअर करा
 
Comments
Shri Narendra Modi addresses a huge rally in Badaun, Uttar Pradesh
Our Govt is devoted to serve the poor, marginalized & farmers: PM Modi
What is the reason that fruits of development could not reach this land under SP, BSP?, asks Shri Modi
Why is it that even after 70 years of independence, 18,000 villages did not have electricity? Previous goverenments must answer: PM
We eliminated interview processes for class III & IV jobs. This has reduced corruption: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील बदाऊन येथील विशाल जनसभेला संबोधित केले. जनतेचा हा अमाप उत्साह पाहता हे स्पष्ट दिसत आहे की येथील जनतेला बदल हवा आहे, असे ते म्हणाले.

यापूर्वीच्या सरकारांवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले,” मी जेव्हा गुजरातमध्ये होतो तेव्हाही मी बदाऊनबद्दल ऐकले होते. सपा आणि बसपाच्या राजवटीमध्ये या भूमीपर्यंत विकासाची फळे का पोहोचू शकली नाहीत, याचे कारण काय आहे?

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले,” आमचे सरकार गरीब, उपेक्षित आणि शेतकरी यांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे. त्यांच्या उत्थानासाठी आम्ही अनेक पावले उचलत आहोत.”

पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना सांगितले,” स्वातंत्र्याला 70 वर्षे उलटून गेल्यानंतरही अद्याप 18,000 गावांपर्यंत वीज का पोहोचली नाही.” ते पुढे म्हणाले, “बदाऊनमधील 500 गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही. यापूर्वीच्या सरकारांनी आतापर्यंत काय केले? त्यांनी याचे उत्तर दिलेच पाहिजे.”

उत्तर प्रदेशातील जनतेला गुन्हेगारांपासून संरक्षण देण्यात उत्तर प्रदेश सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप त्यांनी केला. “उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष गुन्हेगारांना आश्रय का देत आहे?”, असा सवाल त्यांनी केला.

उत्तर प्रदेशातील विधान परिषदेच्या 3 जागांवर भाजपाला विजयी केल्याबद्दल त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेचे आभार मानले. “भाजपाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि आमच्या पक्षाला विधान परिषदेच्या तीन जागांवर विजयी केल्याबद्दल मी उत्तर प्रदेशातील प्रत्येक व्यक्तीचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो”, असे ते म्हणाले.

भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आपल्या सरकारने सरकारी नोकरीमधील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोक-यांसाठी होणा-या मुलाखतीची प्रक्रिया काढून टाकण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी नमूद केले. “ आम्ही तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीच्या नोक-यांसाठी मुलाखतींची प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला.” ते पुढे म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारने राजकीय फायद्यासाठी राज्यातील युवकांच्या भावनांशी खेळ केला.”

रालोआ सरकारसाठी शेतक-यांचे कल्याण सर्वाधिक महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रधानमंत्री फसल बीमा योजनेबाबत माहिती देताना पंतप्रधान मोदी म्हणाले,” आम्ही फसल बीमा योजना आणली आणि ती अनेकांना फायदेशीर ठरत आहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी सपा सरकार का करत नाही?”

यावेळी अनेक कार्यकर्ते आणि नेते देखील उपस्थित होते.

' मन की बात' बाबतच्या तुमच्या कल्पना आणि सूचना पाठवा!
21 Exclusive Photos of PM Modi from 2021
Explore More
उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

लोकप्रिय भाषण

उत्तरप्रदेशात वाराणसी इथे काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
Budget Expectations | 75% businesses positive on economic growth, expansion, finds Deloitte survey

Media Coverage

Budget Expectations | 75% businesses positive on economic growth, expansion, finds Deloitte survey
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Social Media Corner 17th January 2022
January 17, 2022
शेअर करा
 
Comments

FPIs invest ₹3,117 crore in Indian markets in January as a result of the continuous economic comeback India is showing.

Citizens laud the policies and reforms by the Indian government as the country grows economically stronger.