PM Modi campaigns in Hardoi & Barabanki, urges people to elect a BJP Govt
SP, BSP and the Congress never thought welfare of people and always focused on political gains: PM
What is the reason that Uttar Pradesh tops the chart in the entire nation in crime rates? This must change: PM
Our Govt is committed to empower the poor: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या हरदोई आणि बाराबंकी इथे विशाल जनसमुहाला संबोधित केलं. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान केल्याबद्दल श्री मोदी यांनी जनतेला धन्यवाद दिले. ते म्हणाले की उत्तर प्रदेशात विकासाला सुरुवात झाली की पूर्ण देश प्रगतीपथावर चालू लागेल.

ते म्हणाले की जोपर्यंत समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि कॉंग्रेस पक्षाला राज्यातून काढून टाकण्यात येणार नाही तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही. ते पुढे म्हणाले की सप, बसप आणि कॉंग्रेसने लोकांच्या हिताचा विचार कधीच केलं नाही, ते केवळ आपला राजकीय फायदाच बघत आले, हे चित्र बदलायला हवं.

समाजवादी पक्षावर घणाघाती टीका करत मोदी म्हणाले की राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत आहे. ते म्हणाले की,” राज्य सरकारचं या वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष तरी आहे का? रात्रीच्या वेळी स्त्रियांना घराबाहेर पडायला सुरक्षित वाटत नाही. प्रामाणिक लोकांना त्रास देण्यात येतो. गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेशाचा देशात सर्वात वरचा क्रमांक आहे. शस्त्रात्र कायद्याशी संबंधित  देशातल्या एकूण घटनांपैकी ५० टक्के घटना उत्तर प्रदेशात घडतात.

मोदी यांनी सांगितलं की भाजपला सत्ता मिळाल्यास, लघु उद्योजकांसाठी व्यापारकल्याण बोर्ड आणि विश्वकर्मा श्रम कल्याण योजना लागू करण्यात येईल. यापूर्वीच्या सरकारतर्फे खतांच्या किमती कमी करण्यासाठी कुठलेच उपाय योजण्यात आले नाहीत असं सांगून श्री मोदी म्हमाले की, “ चौधरी चरणसिंग होते तेंव्हा त्यांनी खतांच्या किमती कमी केल्या होत्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वाधिक प्राधान्य देऊन आम्ही खतांच्या किमती कमी करण्यासाठी उपाय योजले आहेत. कुठल्याही पक्षाने हे पाउल उचलले नाही.”

श्री मोदी निमयुक्त युरिया बद्दल आणि त्यामुळे मिळणाऱ्या फायद्याबद्दलही बोलले. श्री मोदींनी प्रधानमंत्री पीक विमा योजनच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. ही आत्तापार्यान्ताची एक सर्वसमावेशक योजना आहे असंही ते म्हणाले.

श्री मोदी म्हणाले की भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांच्या सरकारने पुकारलेली लढाई आता थांबणार नाही. ते म्हणाले की भ्रष्टाचार कमी करण्यासाठी त्यांच्या सरकारने सरकारी नोकऱ्यांतल्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीसाठी मुलाखती आता रद्द केल्या आहेत. “याआधी तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या नोकर्यांसाठी लाच घेतली जायची. आम्ही मुलाखतीची प्रक्रिया काढून टाकली, त्यामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण आले आहे.

पंतप्रधान म्हणाले की गरिबांची स्थिती सुधारण्याप्रती भाजप कटिबद्ध आहे. त्यांनी म्हटलं की “गरिबांची ताकद तेंव्हाच वाढेल जेंव्हा आम्ही समाजातून भ्रष्टाचार संपवू शकू.  पंतप्रधानांनी उल्लेख केला की आता सरकारकडून stent ची किंमत कमी करण्यात आल्यामुळे उपचाराचा खर्च कमी होईल आणि त्याचा लोकांना थेट फायदा होईल. मोदींनी भाजप ला मत देण्याचं आवाहन करून म्हटलं की ही निवडणूक उत्तर प्रदेशचं भाग्य बदलणार आहे. पक्षाचे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Click here to read full text speech at Hardoi

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka

Media Coverage

Operation Sagar Bandhu: India provides assistance to restore road connectivity in cyclone-hit Sri Lanka
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 डिसेंबर 2025
December 05, 2025

Unbreakable Bonds, Unstoppable Growth: PM Modi's Diplomacy Delivers Jobs, Rails, and Russian Billions