पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत क्रेडाई युथ कॉन 2019 ला संबोधित केले.




प्रत्येक बेघर असणाऱ्याला 2020 पर्यंत घर मिळेल हे निश्चित करण्यासाठी जलद गतीने काम सुरू केले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे दीड कोटी घरे बांधण्यात आली असून यापैकी शहरी गरीबांसाठी 15 लाख घरे बांधण्यात आली आहेत. सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाअंतर्गत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णत: पारदर्शकता असल्याचे सांगून ते म्हणाले की, जेव्हा सरकार योग्य उद्देशाने धोरणांची आखणी करते त्यावेळी भ्रष्टाचार नष्ट होऊन चांगले निष्कर्ष हाती येतात.

 

बांधकाम नियामक प्राधिकरण अर्थात रेरा मुळे ग्राहक आणि बांधकाम विकासक यांच्यात विश्वास निर्माण झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 28 राज्यात रेरा अधिसुचित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. रेरा अंतर्गत 35 हजारांहून अधिक बांधकाम प्रकल्प आणि 27 हजार दलालांनी नोंदणी केली असून लाखो सदनिका बांधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या चार वर्षात व्यवसाय सुलभीकरण मानांकनात घेतलेल्या झेपेबद्दल बोलताना पंतप्रधान 
म्हणाले की, भारत व्यवसाय सुलभीकरण अंमलात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. यासंदर्भात बोलताना पंतप्रधानांनी बांधकाम परवान्यासह सर्व सरकारी परवाने पूर्वीपेक्षा जलद गतीने देण्यात येत असल्याचा उल्लेख केला.

बांधकाम उद्योग आणि ग्राहकांसाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या कर सुधारणांविषयी बोलतांना पंतप्रधानांनी बांधकामासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंवरील जीएसटी दरात कपात झाल्याचाही उल्लेख केला. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी दिलेल्या कर सवलतींचाही त्यांनी उल्लेख केला. या सर्वांमुळे गृहनिर्माण क्षेत्राला आणि ग्राहकांना एकत्रित फायदा होईल, असे ते म्हणाले.

स्वत:च्या मालकी हक्काचे घर असावे हे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण करण्यात क्रेडाईच्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. नवीन भारत आकाराला येत असताना युथ कॉन होत आहे, असे त्यांनी सांगितले. नवीन भारताची आखणी करण्यात देशातील युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे ते म्हणाले.

त्यापूर्वी पंतप्रधानांनी क्रेडाईतर्फे आयोजित प्रदर्शनालाही भेट दिली.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
EPFO settles 8.3 crore claims in FY26; cheque leaf upload reform benefits 7 crore members, says govt

Media Coverage

EPFO settles 8.3 crore claims in FY26; cheque leaf upload reform benefits 7 crore members, says govt
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 08 ऑगस्ट 2026
August 08, 2026

Infrastructure + Inclusion + Innovation: How PM Modi’s Agenda is Rewiring India’s Growth Engine